रत्नागिरी: शहरातील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकिब जिकीरीया वस्ता (रा. राजिवडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रमोद महाजन क्रिडा संकूलच्या बाजून जाणाऱ्या खेडेकरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना आढळला. या प्रकरणी पोलिस हवालदार आशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.