
देवरुख : “विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदानाद्वारे महाराष्ट्राची जनता आपला कौल मतपेटीत टाकणार आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपल्या पक्षाची ध्येय आणि धोरणे लोकांच्या गळी उतरवत आहेत. भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यात आपला एकही उमेदवार उभा केला नसला तरी महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत या उद्देशाने भाजपाचे कार्यकर्ते काम करत आहेत.” असे भाजपाच्या रत्नागिरी (द.) जिल्हा सरचिटणीस सौ. संगीता सुखदेव जाधव यांनी सांगितले.
महायुतीचा नेत्रदीपक विजय महत्त्वाचा आहे. त्यासाठी मित्रपक्षाचे कार्यकर्ते तन-मन-धन अर्पून जनतेत जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राच्या विकासरथाने पकडलेली गती, मविआ सरकारच्या काळात जनतेच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, केंद्र सरकार व राज्य सरकारने कार्यान्वित केलेल्या कल्याणकारी योजना जनतेशी संवाद साधून समजावून देत आहेत.
अनेकजण या काळात प्रलोभने घेऊन येतील, मात्र आपण मात्र महायुती सरकारने केलेल्या कामांची यादी त्यांच्यापुढे ठेवायची; शेखर सरांनी उपसलेल्या कष्टांची किंमत कोणत्याही प्रलोभनाने होऊ शकत नाही. मुळात शेखर सरांनी विधानसभा क्षेत्रात केलेल्या कामाची बरोबरी दुसरा कोणीही करू शकत नाही यावर जाणकारांचे एकमत असताना आपण सर्वजण सरांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. असे सौ. संगीता जाधव यांनी प्रतिपादन केले.
विकसित चिपळूण-संगमेश्वर हा संकल्प घेऊन मागील ५ वर्ष सातत्याने काम करणाऱ्या शेखर सरांनी त्यापूर्वी ५ वर्षांपासून तयारी सुरु केली होती. म्हणजेच एकूण १० वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या शेखर सरांना कोणाची स्पर्धा असण्याचे कारण नाही. पण मतदारांना भावनिक करणे, आर्थिक दौर्बल्याचा अनुचित लाभ घेणे आणि स्वार्थ साधण्यासाठी भूलथापा मारणे यांतूनलोकांची दिशाभूल सुरु आहे.
सरांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गाव-खेड्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आहे. नोकरी, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग अशी विविध क्षेत्रांत या विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्याचे व त्याला स्वावलंबी करण्याचे कार्य करून शेखर सर थांबले नाहीत तर त्यांनी व्यवसायाभिमुख शिक्षण आणून अनेक गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना सक्षम केले ज्यामुळे आज त्या कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.
पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास करताना कोणत्याही क्षेत्राला वंचित न ठेवता भरभरून निधी उपलब्ध करून देणाऱ्या शेखर सरांकडे पुढील ५ वर्षांचा रोडमॅप तयार आहे. विकासाची प्रतिकृती डोळ्यांसमोर असेल तर अर्धे काम झाले असे मानले जाते त्यामुळे या ५ वर्षांत विकासाची गती दुप्पट होईल यात शंका नाही. पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासातही शेखर सरांनी प्रभावी कार्य केले आहे. आत्तापर्यंत अएक प्रचारसभांमध्ये शेखर सरांनी कोरोना काळात केलेली रुग्णसेवा, महापुरात केलेली जनसेवा, महिला व बालकल्याण क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य यांची माहिती घेतली आहेच. त्यामुळे एकूणच शेखर सरांनी केलेले सर्वस्पर्शी कार्य जनतेच्या पसंतीस उतरले आहे.
आमचे नेते मा. ना. रविंद्र चव्हाण मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्री. राजेशदादा सावंत यांच्या नेतृत्त्वात त्यांची एक सहकारी व विधानसभा निवडणूक कोअर टीमची सदस्या म्हणून आम्ही चिपळूण-संगमेश्वर विधानसभेत राष्ट्रवादी-महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मा. श्री. शेखर निकम सरांना जनतेचा मोठा आशीर्वाद मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.