संगमेश्वर : दिनांक 14 नोव्हेंबर हा दिन संपूर्ण भारतात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणून विशेषतः मुलांसोबत साजरा केला जातो.
बालकांवर त्यांनी अपार प्रेम केले. सदैव चाचा नेहरूंच्या भोवती मुलांचा गोतावळा असायचा. सर्व मुलांच्यात चाचा नेहरू मिसळून जात असत.त्यांना असा लळा होता की ते कुणाचही मूल उचलून घेत. त्यांना पदाचा अभिमान नव्हता. मुले त्यांच्याभोवती किलबिलाट करत. त्यांना मुले चाचा म्हणू लागली होती. त्यांची आठवण म्हणून देशभर “बाल दिन” साजरा केला जातो.
या दिनाचे औचित्य साधून संगमेश्वर परिसरात मुलांच्या बौद्धिक विकासाची चालना देणारे ” हसती दुनिया “या पुस्तकाच्या 50 प्रतींचे वाटप सौ. शितल दिनेश अंब्रे (नावडी) यांनी केले.
बालदिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.लहान मुलांसाठी हा दिवस खूपच खास असतो.मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्यासाठी बाल दिन साजरा केला जातो.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस 1956 पासून बालदिन साजरा केला जात आहे. फक्त भारतामध्ये बालदिन 14 नोव्हेंबरला साजरा होतो. या दिवसाचे औचित्य साधून शाळांमध्ये खेळ,भाषणे,वेशभूषा स्पर्धा,विविध प्रकारच्या स्पर्धा असे कार्यक्रम घेतले जातात.
कथा, कविता,रंगभरण,हास्य विनोद, चित्रकथा,शब्दकोडे, कुतूहल,आरोग्यमंत्र, व्यक्ती विशेष, दिनविशेष अशा मनाला मनोरंजन होणाऱ्या साहित्य ज्ञानाने प्रगतीपथावर नेणारे बालकांचे आवडते व पालकांच्या पसंतीस उतरलेले बालप्रीय पुस्तक “हसती दुनिया” मनाला आनंद देणारे आहे. तिवरे,माभळे, भिरकोंड, कोंडअसुर्डे,संगमेश्वर,परचुरी आदी गावात या पुस्तकाचे वाटप शितल अंब्रे व दिनेश अंब्रे यांनी केले आणि सर्व बालकांना त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.