विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन; पहिल्या विमानाचं यशस्वी टेक ऑफ, दोहाहून मुंबईला रवाना..
एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर युनिटच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाने उड्डाण केलं आहे.विलीनीकरणानंतर एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटचा कोड ‘AI2XXX’ असेल.
विस्तारा एअर इंडियामध्ये विलीन; पहिल्या विमानाचं यशस्वी टेक ऑफ, दोहाहून मुंबईला रवाना..
विस्तारा ही विमान वाहतुक कंपनी आज मंगळवारी 12 नोव्हेंबर रोजी एअर इंडियामध्ये विलीन झाली आहे. काल 11 नोव्हेंबरला विमान वाहतूक कंपनी विस्ताराने शेवटचे उड्डाण भरले. त्यानंतर आज विलीनिकरनानंतर विस्तारा-एअर इंडियाच्या पहिल्या विमानाने यशस्वी उड्डाण केलं. एअर इंडिया-विस्तारा युनिटचे पहिले उड्डाण सोमवारी रात्री दोहाहून मुंबईसाठी रवाना झाले. ‘AI2286’ कोडसह चालणारे हे उड्डाण स्थानिक वेळेनुसार रात्री 10.07 वाजता दोहाहून निघाले आणि मंगळवारी सकाळी मुंबईला पोहोचले.
एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणानंतर युनिटचे हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण आहे. या विलीनीकरणानंतर, विस्तारित एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची 25.1% भागीदारी असेल. (फोटो सौजन्य – pinterest)
एअर इंडिया-विस्ताराचे पहिले उड्डाण…
AI2286 दोहा ते मुंबई हे विमान विलीनीकरणानंतर एअर इंडिया आणि विस्तारा यांनी चालवलेले पहिले उड्डाण होते. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट Flightradar24.com नुसार, या विमानाने दोहा येथून रात्री 10:07 वाजता उड्डाण केलं. फ्लाइटचा कालावधी अंदाजे तीन तासांचा आहे. त्यामुळे मंगळवारी पहाटे 1.30 वाजता विमान मुंबईत दाखल झाले. विलीनीकरणानंतर एअर इंडियाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विस्तारा फ्लाइटचा कोड ‘AI2XXX’ असेल. बुकिंगच्या वेळी प्रवाशांना विस्तारा फ्लाइट ओळखण्यात मदत करण्यासाठी हा कोड वापरला जात आहे.
विस्ताराची ही शेवटची फ्लाइट…
विस्ताराचा फ्लाइट कोड ‘UK’ वरून* ‘AI2XXX’ असा बदलला आहे. विस्ताराचे शेवटचे फ्लाइट ‘UK 115’ हे दिल्लीहून सिंगापूरला जाणार होते, जे सोमवारी रात्री 11.45 वाजता निघाले. एअर इंडिया आणि विस्तारा हे दोन्ही टाटा समूहाचे भाग आहेत. विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम आहे.
देशांतर्गत पहिलं उड्डाण…
आंतरराष्ट्रीय उड्डाणानंतर, जर आपण देशांतर्गत उड्डाणाबद्दल बोललो तर, एअर इंडिया-विस्तारा एकात्मिक युनिटचे पहिले उड्डाण AI2984 मंगळवारी पहाटे 1:30 वाजता मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले. एअर इंडिया आणि विस्ताराचे विलीनीकरण हे नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाचे पाऊल आहे. विस्तारा, ही टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्स यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. ज्या अंतर्गत ते आता एअर इंडियाचा भाग बनले आहे. विलीनीकरणानंतर, विस्तारित एअर इंडियामध्ये सिंगापूर एअरलाइन्सचा 25.1 टक्के हिस्सा असेल.
विलीनीकरणानंतर विस्तारा प्रवाशांसाठी काय बदल होईल?..
विलीनीकरणानंतर पहिल्या महिन्यात, विस्तारा तिकीट असलेले 1,15,000 हून अधिक प्रवासी एअर इंडियाच्या नावाने उड्डाण करतील. विस्ताराचा अनुभव बदलणार नाही, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे. विलीनीकरणानंतर विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइट कोडमध्ये ‘2’ जोडले जाईल. उदाहरणार्थ, विस्ताराचा फ्लाइट कोड UK 955 होता, जो आता AI 2955 होईल.
एअर इंडियाची घोषणा…
विस्तारा सारखेच उत्पादन आणि सेवा अनुभव भविष्यातही लोकांना उपलब्ध होईल, असे एअर इंडियाने जाहीर केले होते. या बदलामध्ये मदत करण्यासाठी विमानतळांवर हेल्प डेस्क कियोस्क स्थापित केले जातील. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील चिन्हे आणि माहिती प्रवाशांना योग्य चेक-इन डेस्कवर निर्देशित करेल.