*राजापूर / प्रतिनिधी –* कोकणातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या राजापूर बाजारपेठेतील विठ्ठल राम पंचायतन मंदिरात मंगळवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक एकादशी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्तिक एकादशी उत्सवाच्या निमित्ताने श्री विठ्ठल राम पंचायतन मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन पहाटे ५.३० वाजता महापूजा व अभिषेक , सकाळी ९ ते दुपारी ३वारकरी संप्रदायाची भजने , सायंकाळी ४.३० वाजता – पुंडलिक भेट पालखी सोहळा व रातौ ८ वाजता महाआरती, गाऱ्हाणे आणि प्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत . तरी भाविकानी या दिवशी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संभाजी पेठ मित्र मंडळ , भक्तवत्सल भक्तिभाव संभाजी पेठ राजापूर, संभाजी पेठ महिला मंडळ राजापूर व संभाजी पेठ युवक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .