कार्ले खिंड पात्रूदेवी मंदिरातील चोरीचा गेलेला मुद्देमाल केला सपूर्द

Spread the love

अलिबाग : अलिबाग कार्ले खिंड येथील भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या पात्रू देवी मंदिरात १२ जानेवारी रोजी चोरीची घटना घडली होती. अलिबाग पोलिसांनी या चोरीचा छडा लागला असून आरोपीला ४८ तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल ही चोरट्या करून हस्तगत केला आहे. महाशिवरात्र दिनाचे औचित्य साधून मंदिर प्रशासनाला चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी सपूर्द केला आहे.

अलिबाग मुरुड विधानसभा आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस, पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. दिलीप घोडके राहणार पाथर्डी, अहमदनगर असे अटक झालेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांनी आरोपीला एका गुन्ह्यात अटक केली होती.

अलिबाग कार्ले खिंड येथे पुरातन पात्रूदेवी मंदिर आहे. भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. ११ ते १२ जानेवारी या कालावधीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आधी मंदिरात मद्य प्राशन करून त्यानंतर मंदिरातील मूर्ती आणि आतील सामानावर ७ हजार ८०० रुपयाच्या मुद्दे मालावर डल्ला मारून कारने पसार झाले. या घटनेने भाविकांमध्ये नाराजी पसरली होती. चोरी प्रकरणाबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

चौल येथील दत्त मंदिरातील चोरीचा सुगावा अद्याप लागला नसताना पात्रूदेवी मंदिरात झालेल्या चोरीने पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते. अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस आणि त्याच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केली. जिल्ह्यासह राज्यातील पोलिसांच्या गृपवर या चोरी बाबत माहिती अलिबाग पोलिसांनी पाठवली होती. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांनी एका गुन्ह्यात आरोपीला अटक केली होती. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अलिबाग कार्ले खिंड येथे मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली होती.

अलिबाग पोलिसांनी ४८ तासात या चोरीचा छडा लावला होता. पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया करून मुद्देमाल मंदिर प्रशासनाला सपूर्द केला आहे. मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने ग्रामस्थांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page