नवी दिल्ली/मुंबई- सोमवार 13 मे रोजी दुपारी 3 वाजता मुंबईत हवामानात अचानक बदल झाला. धुळीच्या वादळानंतर पाऊसही सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे दिवसा रात्रीसारखे दृश्य मुंबईत दिसू लागले. दुपारी तीन वाजताच मुंबईत सर्वत्र अंधार पडल्यान मुंबई विमानतळावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे वळवण्यात आली आणि काहींचे वेळापत्रक बदलण्यात आले. तसेच घाटकोपर भागात मोठे होर्डिंग थेट पेट्रोलपंपाच्या शेडवर कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू झाला असून 59 जण जखमी झाले आहेत. तर 67 जणांची सुटका देण्यात आली.
▪️मुंबईतील घाटकोपर, वांद्रे, कुर्ला, धारावी परिसरात ताशी 60 किमी वेगाने वारे वाहत आहेत. पुढील 3 ते 4 तासात असेच वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी वाऱ्याचा वेग 50-60 किमी/ताशी असू शकतो. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊ शकतो.
🔹️मुख्यमंत्री शिंदे यांनी केली घटनास्थळाची पाहणी…
🔹️महाकाय बॅनरखाली 70-80 वाहनं अडकली…
▪️मुंबईतील घाटकोपर परसरात एक महाकाय बॅनर पडून मोठं नुकसान झालं आहे. पेट्रोल पंपावरच हे बॅनर कोसळल्याने पेट्रोल पंपाचं नुकसान झालं असून बॅनरखाली तब्बल 70 ते 80 वाहनं अडकली आहेत. या वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. येथील पेट्रोल पंपाखाली बाईक आणि रिक्षा चालक अडकले होते. गॅस कटरच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. विशेष म्हणजे हे बॅनर हटविण्यासाठी महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच संबंधितास नोटीस बजावली होती, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फोनवरुन बोलताना दिली. या दरम्यान,अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
🔹️मुंबईतील बदललेल्या हवामानाची 4 छायाचित्रे…
▪️त्याच वेळी, देशात वादळ, पाऊस आणि गारपीट सुरू आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पाच दिवस पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीटही होऊ शकते. राजस्थानमध्ये 16 मेपर्यंत पावसाळा सुरू राहणार आहे.
▪️आज देशातील 25 राज्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व्यतिरिक्त यामध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, बिहार आणि झारखंडचाही समावेश आहे. तसेच ईशान्येतील 7 राज्यांचाही समावेश आहे.
▪️पावसामुळे राज्यातील उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जवळपास संपुष्टात आला असला तरी उष्णतेचा प्रभाव कायम असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये रविवारी तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले.
▪️राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये 3 दिवसांनी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. रविवारी मध्य प्रदेशातील नर्मदापुरम येथे देशातील सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
🔹️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…
▪️देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतके मोठे होर्डिंग पडल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक अनियमितता या ठिकाणी दिसली. प्रामुख्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. लोकांना वाचविणे ही महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी आहे. जे काही लोक अडकले त्यांना काढण्याचे काम सुरू आहे.
दादर, घाटकोपरमध्ये मेट्रोचा खोळंबा…
▪️मुंबईतील दादर, घाटकोपर परिसरातही वादळी वारं सुटलं असून हवामान ढगाळ झालं आहे. पुढील काही तासांत येथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, वातावरण फिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून वाहतूक सेवेवरही त्याचा परिणाम जाणवत आहे. टॅक्सी, ऑटो व वाहनचालकांनीही जागेवर थांबा केल्याचं दिसून येत आहे. तर, दुसरीडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायवर बॅनर पडल्याने मुंबई मेट्रोचा खोळंबा झाला आहे.
🔹️पेट्रोलपम्पावर कोसळले होर्डिंग…
▪️मुंबईसह घाटकोपर परिसरातील न्यू अदानी कॉम्पेलक्सवर असलेले लोखंडी होर्डिंग वाऱ्यामुळे खाली कोसळली. हे लोखंडी होर्डिंग थेट पेट्रोल पंपाच्या शेडवर कोसळल्याचे सांगितले जात आहे. यात काही जीवितहानी होण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
🔹️बॅनर पडल्याने मेट्रो सेवा ठप्प…
▪️मिळालेल्या माहितीनुसार, एअरपोर्ट रोड स्टेशनवरवर ही मेट्रो थांबली आहे, वादळी वाऱ्यामुळे बॅनर पडल्याने घाटकोपर-वर्सोवो मेट्रो ठप्प झाली. मेट्रो प्रशासनाकडून हा बॅनर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटकोपर येथून वर्सोवा मार्गावर धावणारी ही मेट्रो जागेवर थांबली आहे. त्यामुळे, प्रवाशी खोळंबले असून एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरच अडकून पडले आहेत. दरम्यान, विमानसेवेरही या वादळी वाऱ्याचा परिणाम झाला असून काही विमानांचे उड्डाण वळवण्यात आले असून वेळेतही बदल झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
🔹️वाऱ्याचा वेग इतका होता की, मुंबईतील एका ठिकाणी मोठे बॅनर कोसळले….
🔹️हवामान विभागाचा नेमका अंदाज काय ?…
▪️पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
▪️उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) , हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
▪️बदलापूरमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे तर कल्याण, डोंबिवलीत धुळीसह जोरदार वारा वाहत असून काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे.
▪️विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात ढगाळ वातावरण झालं असून जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे.
🔹️24 तासात मुसळधारेची शक्यता..
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यासोबतच, मुंबई, पालघरमध्येही पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाजही आयएमडीमने दिला आहे.
🔹️यलो अलर्टही जारी…
नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही भागात पावसाची शक्यता असून हवामान विभागाने अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुणे, सातारा, लातूर, नांदेड जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
🔹️भविष्यात कसे असेल हवामान?…
▪️14 मे : छत्तीसगड-गुजरातमध्ये ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये विजांचा कडकडाट अपेक्षित आहे.
मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटकमध्ये 40-50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील.
उष्णतेचा परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहे.
▪️15 मे : ईशान्येकडील राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि गडगडाटाचा इशारा
ओडिशासह ईशान्येकडील सात राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि गोव्यात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.
तामिळनाडू, पुडुचेरी, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
🔹️उष्णतेची लाट ओसरली, मान्सूनची जोरदार चिन्हे…
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, चांगल्या मान्सूनची चिन्हे हळूहळू बळकट होत आहेत. पॅसिफिक आणि हिंदी महासागरात चांगल्या पावसासाठी आवश्यक बदल दिसू लागले आहेत. मान्सूनच्या पहिल्या महिन्यात अल निनो संपेल आणि काही आठवडे उदासीन स्थिती राहिल्यानंतर ला निनाची परिस्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज जगातील सर्व हवामान संस्था वर्तवत होते.
▪️यूएस एजन्सी आणि ऑस्ट्रेलियन वेदर ब्युरोने पुष्टी केली आहे की जगातील सर्वात मोठा समुद्र असलेल्या पॅसिफिक महासागराच्या काही भागांमध्ये तापमान वेगाने कमी होत आहे. दुसरीकडे, IMD ने हिंद महासागर द्विध्रुवीय स्थिती सकारात्मक होत असल्याची पुष्टी केली आहे.
🔹️हिंदी महासागरातील तापमान डेंग्यूचा अंदाज लावेल…
हिंदी महासागराच्या तापमानात झालेल्या बदलामुळे जगभरात डेंग्यूचा धोका वाढू शकतो. बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, हिंदी महासागरातील तापमानात वाढ झाल्यामुळे जगभरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.
▪️अलीकडे अल निनोमुळेही हा विस्तार दिसून आला. 1990 ते 2019 या कालावधीत जगभरातील 46 देशांमध्ये डेंग्यूची नोंद झालेली वार्षिक प्रकरणे आणि 2014 ते 2019 या कालावधीत 24 देशांमध्ये नोंदलेली मासिक प्रकरणे आणि हिंदी महासागराचे तापमान यांचा अभ्यास करण्यात आला आहे.