दिनांक 7 मे 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडं दुर्लक्ष करू नये; जाणून घ्या १२ राशींचं राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आनंदोस्तव साजरा करण्याचा आहे. आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगला जाईल. प्रत्येक काम यशस्वी होईल. घरातील वातावरण आनंदाचं असेल. स्त्रीयांना माहेरहून काही लाभ होऊन एखादी चांगली बातमी मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्र आणि स्नेह्यांसह आनंददायी प्रवास कराल. त्यांच्याकडून भेटवस्तू प्राप्त झाल्याने आपणास आनंद होईल.

▪️वृषभ :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपणास विविध चिंता सतावतील. प्रकृतीची साथ मिळणार नाही. स्नेही व नातलग ह्यांच्याशी मतभेद झाल्यानं घरात विरोधी वातावरण निर्माण होईल. कामे अपूर्ण राहतील. काही कारणास्तव खर्च वाढेल. केलेल्या कष्टाचं फळ असमाधानकारक असेल. त्यामुळे नैराश्य येईल. घाईघाईनं घेतलेल्या निर्णयामुळं गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

▪️मिथुन :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापारी वर्गासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. मित्रांकडून लाभ होतील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळं आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे. पत्नी आणि संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

▪️कर्क :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील. नवीन सजावट करून घराची शोभा वृद्धिंगत कराल. आईकडून लाभ होईल. शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक प्रसन्नता लाभेल. धन आणि प्रसिद्धी वाढेल.

▪️सिंह :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आळस आणि थकवा ह्यात जाईल. आपल्या तापॅट स्वभावामुळं मानसिक तणाव राहील. पोट दुखीनं हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावं लागतील. नकारात्मक विचार, वर्तन आणि नियोजन यापासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

▪️कन्या :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढल्यानं आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. अवैध कामांपासून दूर राहावं. एखादा प्रवास संभवतो. सरकार विरोधी कृतीमुळं समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

▪️तूळ :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूनं कुटुंबीयांसह बाहेर जावं लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता आणि कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्यानं निराश आणि क्रोधीत व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचे दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईकडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्यानं मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. प्राप्ती कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती राहील. शक्यतो आज नवीन कामाची सुरूवात करू नका.

▪️धनू :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज कार्यपूर्ती न झाल्यानं नैराश्य येण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. संतती विषयक बाबींमुळं चिंता वाढतील. शक्यतो आज प्रवास टाळावेत.

▪️मकर :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती आणि आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळं मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. एखादा अपघात संभवतो. मानसिक उद्वेग आणि एकंदरीत प्रतिकूलता यामुळं दिवस चिंतातुर अवस्थेत जाईल.

▪️कुंभ :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपणास मनानं हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या आणि आप्तांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

▪️मीन :

आज चंद्र मेष राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. रागावर आणि वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page