रत्नागिरी, दि. 1 (जिमाका) : गृह मतदान करताना गोपननीयता राखली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यांनी भेट देऊन पाहणी करावी, अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपर्क व्यवस्थापन तथा जिल्हा निवडणूक व्यवस्थापन योजनाबाबत आज आढावा बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुदुर्गचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, परिविक्षाधीन आय ए एस डाॕ. जस्मीन, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई आदीसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
क्षेत्रीय स्तरावरुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी मतदार चिट्टीचे वाटप, वेबकास्टींग, मतदार यादीवरील पीबी मार्कींग याबाबत विधानसभा मतदार संघनिहाय आढावा घेतला. ते म्हणाले, सहाय्यक निवडणूक अधिकारी, तहसिलदार यांनी मतदान केंद्रावंरील वेबकास्टींगबाबत भेट देऊन पाहणी करावी. त्याची रंगीत तालिम पहावी. झोनल अधिकारी, तलाठी यांची बैठक घेऊन नियोजन तसेच व्यवस्था याबाबत आढवा घ्यावा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांने दिलेले आरोग्य नियोजन सर्वांना पाठविण्यात येईल, त्यानुसार कार्यवाही करावी .