हैदराबाद- निवडणूक आयोगाने ऐतिहासिक स्वच्छता मोहीम राबवत हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील सुमारे ६ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. हटवलेली नावे मरण पावल्या व्यक्ती, इतरत्र स्थायिक झालेले किंवा बनावट होती.
एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादच्या निकालावर याचा परिणाम होणार, हे निश्चत. असदुद्दीन ओवेसी २००२ पासून या जागेवर विजयी होत आहेत. काही वर्षांपासून फिरोज खानसारखे भाजप व काँग्रेसचे नेते दुबार किंवा खोट्या मतदारांचा मुद्दा उपस्थित करत होते.
हैदराबादमध्ये विधानसभेच्या सात जागा जिंकणारे एमआयएम याच मतांच्या फेरफारातून निवडणुका जिंकत असल्याचा आरोप आहे.
एकट्या ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात तब्बल ६०,९५३ डुप्लिकेट मते आढळून आले. त्यापैकी ३,१०१ नावे मृत, ५३,०१२ मते इतरत्र स्थायिक झालेल्यांची आहेत. चंद्रयांगुट्टा व याकूतपुरा विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे ५९,२८९ व ४८,२९६ मते हटवण्यात आली. २०१९ मध्ये हैदराबाद लोकसभेत २० लाख मतदार होते. त्यापैकी १२% मते कमी झालीत. मात्र, वर्षभरात जिल्ह्यात ५ लाख नवी नावे समाविष्ट झाली.