राजापूर (प्रतिनिधी): मंगळवारी राजापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांनी राजापुरात मुस्लीम समाज बांधवांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. पै. जावेद ठाकूर यांच्या निवास्थानी ना. राणे यांनी राजापुरातील मुस्लीम बांधवांशी संवाद साधला. विकासाचे दुसरे नाव म्हणजे नारायण राणे अशी आपली ओळख आहे, आपण कायमच कोकणी जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहात व यापुढेही रहाणार आहात, त्यामुळे आंम्ही देखील सर्वजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहु अशी ग्वाही उपस्थित मुस्लीम बांधवांनी ना. राणे यांना दिली.
ना. राणे यांनी मंगळवारी राजापुरात अनेक मान्यवरांच्या भेटी घेत त्यांच्याशी थेट संवाद साधला. राजापुरातील ठाकूर परिवाराशी राणे कुटुंबीयांचे कायमच स्नेहपुर्ण संबध राहिले आहेत. मंगळवारी ना. राणे यांनी पै.जावेद ठाकूर यांच्या मधीलवाडा येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी तेथे उपस्थितीत राजापुरातील मुस्लीम बांधव, मौलाना यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
प्रारंभी ठाकूर परिवाराच्या वतीने ठाकूर उद्योग समुहाचे अशफाक ठाकूर, हनिफ ठाकूर, आसिम ठाकूर, सुलतान ठाकूर, शाहनवाज ठाकूर, आदील ठाकूर यांनी ना. राणे यांचे स्वागत केले.
यानंतर ना. राणे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना अशफाक ठाकूर यांसह अनेकांनी आपण कायमच विकासाचे राजकारण केलेले आहे, राणे तेथे विकास हे समिकरण आहे, कोकणच्या प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देणारे आपले नेतृत्व असल्याचे यावेळी या मान्यवरांनी सांगितले. आंम्ही कायमच आपल्याला साथ दिलेली आहे यापुढेही देऊ असा विश्वास यावेळी दिला.
याप्रसंगी राणे यांनी मुस्लीम समाज बांधवांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या. आपले प्रश्न व समस्या सोडविण्याची ग्वाही यावेळी ना. राणे यांनी दिली. आपण काम करताना कधीही जात, पात, धर्म, पंथ पहात नाही तर माणूस म्हणून प्रत्येकाचे काम करतो असे सांगत कशाप्रकारे आपण सर्व समाजातीमाजातील लोकांची कामे केली याबाबतही माहिती दिली. आपले प्रेम आणि सदिच्छा कायम पाठीशी राहोत असेही नमुद केले.
याप्रसंगी पाच मोहल्ला कमिटीचे अध्यक्ष शौकत नाखवा, ईस्माईल वाघू, मौलाना अब्दुल बक्कर नेवरेकर, माजिद ईसफ, व्यापारी रफीक उर्फ बाबू मिठा, अशफाक काझी, सलाम खतीब, अ. रज्जाक डोसानी, अल्ताफ बारगिर, अशफाक गडकरी, आबीद ठाकूर, ताबीश नाखवा, समीर नाखवा, रियाज बारगिर, एजाज काझी, एजाज बांगी, अजिम जैतापकर, सलिम मुजावर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, अरवींद लांजेकर, डॉ. मिलींद कुलकर्णी आदींसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.