दिनांक 11 एप्रिल 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून आज कुणाला मिळणार शुभफल, कुणाला लागणार चिंता? वाचा राशी भविष्य….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती आणि उत्साहाने होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर मात्र, आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र आणि आप्तेष्टांची भेट होईल. दुपारनंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावं लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी.

▪️वृषभ :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. द्विधा मनःस्थितीमुळं आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरगुती वातावरण आनंदी राहील.

▪️मिथुन :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज मित्रांकडून आपणास लाभ होईल. भविष्यात फायदा होऊ शकेल अशा नवीन लोकांच्या ओळखी होतील. धनलाभ होईल. प्रवाचे आणि सहलीचे नियोजन करू शकाल. सरकारी कामातून फायदा होईल. दुपारनंतर थोडे सावध राहावयास लागेल. इतरांच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आर्थिक व्यवहार टाळावेत.

▪️कर्क :

आज चंद्र रास मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्यानं प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीनं आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकाल.

▪️सिंह :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. दिवसाची सुरवात शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापानं इतरांची मने दुखवाल. दुपारनंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांशी महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.

▪️कन्या :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. गूढ विद्येची आवड निर्माण होईल.

▪️तूळ :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज ज्या ज्या क्षेत्रात आपण वावराल त्या त्या क्षेत्रात आपली प्रशंसा केली जाईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासानं आपण आनंदित व्हाल. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. दुपारनंतर कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. शक्यतो प्रवास टाळावेत.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आनंद साजरा करण्याचा आहे. व्यापार – व्यवसायात आपण व्यस्त राहाल आणि त्यातून लाभ सुद्धा होतील. अनेक लोकांच्या सहवासाने विचारांची देवाण – घेवाण होईल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन समाधानाचे राहील. सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा गौरव होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकाल. वाहनसौख्य लाभेल.

▪️धनू :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात शारीरिक आणि मानसिक थकव्याने होईल. कष्टाच्या प्रमाणात अपेक्षित यश प्राप्ती होणार नाही. दुपारनंतर मात्र, शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आप्तेष्टांसह दिवस आनंदात घालवू शकाल. आर्थिक लाभ झाल्याने भविष्यासाठी काही तरतूद कराल. आपल्या हातून एखादे सत्कार्य घडेल.

▪️मकर :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज आपण अती भावनाशील व्हाल. संपत्ती संबंधी दस्तावेजात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. मानसिक त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शासकीय विषयात यशस्वी होऊ शकाल. अपघाताची शक्यता असल्यानं शक्यतो प्रवास टाळावेत.

▪️कुंभ :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपले विचार स्थिर राहणार नसल्याने कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. लेखन कार्य करू शकाल. इतरांच्या वागण्या बोलण्यानं आपलं मन दुखावले जाऊ शकते. वैचारिक गोंधळामुळं आज संपत्ती संबंधित कोणताही व्यवहार न करणं हितावह राहील.

▪️मीन :

आज चंद्र मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपणास आपल्या स्वार्थाचा त्याग करावा लागेल. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील. वाद व मनःस्ताप टाळण्यासाठी आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. कामासाठी एखादा प्रवास संभवतो. नवीन कार्याचा आरंभ करू शकाल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page