ईडीमध्ये अधिकारी होण्याची थेट सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी…

Spread the love

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत.

ईडीमध्ये अधिकारी होण्याची थेट सुवर्णसंधी, बंपर भरती सुरू, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी…

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून एक नाव देशभरात तूफान चर्चेत आहे, ते म्हणजे ईडी. सध्या राज्यातील अनेक नेत्यांच्या घरी आणि कार्यालयांवर ईडीच्या धाड पडल्याचे आपण सतत ऐकत आहोत. हेच नाही तर ईडीने काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांना चाैकशीसाठी बोलावले होते. हेच नाही तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ईडीने अटक केलीये. आता नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी त्याच ईडी विभागात नोकरी करण्याची मोठी संधी आहे. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयमध्ये (Enforcement Directorate) नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. ईडीकडून विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठ संधी ही तुमच्याकडे आहे.

अंमलबजावणी संचालनालयकडून नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. ईडीकडून ही एकप्रकारची बंपर भरतीच राबवली जातंय. ईडीकडून उपसंचालक ते ड्रायव्हर अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी enforcementdirectorate.gov.in या साईटला भेट द्या. तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे थेट ईडी विभागामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट देखील पदानुसार ठरवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची अधिसूचना https://enforcementdirectorate.gov.in/vacancies या लिंकवर मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत.

अर्ज केल्यानंतर उमेदवाराची लेखी चाचणी आणि मुलाखत घेतली जाईल, त्यानंतर उमेदवाराची निवड केली जाईल. या भरती प्रक्रियेचा अर्ज या enforcementdirectorate.gov.in या साईटवर आरामात मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल 2024 आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page