कपिल पाटील यांचे ग्रामस्थांकडून मुरबाड तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत…
ठाणे/मुरबाड/ प्रतिनिधी/लक्ष्मण पवार- भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाची सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर, मुरबाडच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे मतदारसंघात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
भाजपाच्या वतीने मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, सुपर वॉरियर्स आणि भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुरबाड शहरात घेण्यात आला. या प्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले की, जातीच्या राजकारणा पेक्षा विकासाला मत द्या, या ठिकाणी ३५ हजार कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत. कल्याण मुरबाड माळशेजघाट हा नॅशनल ४ पदरी हायवे अकराशे कोटी रूपयांचा असून त्याचे काम सुरु झाले असुन त्यांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. खासदार, आमदार यांची विकास कामे जनतेला पटऊन द्या, बडोदा हायवे मुळे रेल्वेचे अलायमेंट बदलले आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळण्या साठी प्रयत्नशील आहोत, काही तांत्रीक अडचणीं मुळे रेल्वेला उशीर होत आहे माञ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने येत्या ६ महीन्यात मुरबाडकरांच्या दारात रेल्वे येणारच असा आशावाद केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. माऊली गार्डन येथील या मेळाव्यास ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे, हरेश खापरे, सुभाषआप्पा घरत, लियाकत शेख, शितल तोंडलिकर, दिपक खाटेघरे, किसन अनंत कथोरे, जयवंत सूर्यराव, नारायण गोंधळी, महेंद्र पवार व अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी कार्यकर्त्यांशी पुढे बोलतांना पाटिल म्हणाले कि, आपली ताकद मजबूत आहे, समोर कोण्हीच नाहीं, मतदान व विजयाच्या लीड मध्ये मुरबाड सर्वात पुढे असेल अशा आत्मविश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
मुरबाड मधील या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपील पाटील यांना कल्याण ते मुरबाड रस्त्यावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या शुभेच्छांचा कपिल पाटील यांनी स्विकार केला. मामनोली येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी बाळा कोर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. शहाड पुलाजवळ प्रीतम शर्मा, म्हारळ येथे जय श्रीराम सेनेचे महेंद्र सिंग, कांबा येथे दीपक सुरोशी, गोवेली येथे सचिन दळवी, बापसई येथे नामदेव टेंभे, दिलीप टेंभे, कोलम येथे मोहन राऊत, नेताजी भोईर, अप्पू भोईर, कमलाकर राऊत, मामनोली येथे सरपंच तुषार कोर, मुकेश शेलार, अनंता दळवी, धानिवली येथे तुळशीराम भोईर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी स्वागत केले. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे आभार मानून भिवंडी लोकसभा क्षेत्रात महाविजय २०२४ साकारण्याचा निश्चय करण्याचे आवाहन केले. त्यामुळे आपकी बार मोदी सरकार एक लाख मेघा होल्टचा विरोधकांना झटका देऊन आपण निवडून येणार असे कपिल पाटील यावेळी व्यासपीठावर बोलत होते.