११ मार्च /रत्नागिरी : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये भव्य रंगमंचावर आले रामराज्य या विषयावर कीर्तनसंध्या महोत्सव सुरू आहे. रामराज्य, राम मंदिराची प्रतिष्ठापना यावर राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा राम कथा सांगत आहेत. या महोत्सवात भाजपाचे माजी आमदार, जुने-जाणते, निष्ठावंत बाळ माने यांना आफळेबुवांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते.
कीर्तनसंध्या महोत्सवाला दोन दिवसांपूर्वी सुरवात झाली. रामकथा, गीत रामायणातील निवडक गीते असे यंदाच्या कीर्तनसंध्येचे स्वरूप असून कीर्तनप्रेमींची गर्दी होत आहे. रत्नागिरीच्या कानाकोपऱ्यातून या महोत्सवाकरिता लोक येत आहेत. राष्ट्रप्रेमी, रामभक्त आणि १९९० आणि १९९२ मध्ये कारसेवेत सहभागी झाल्याबद्दल बाळ माने यांना सन्मानित करण्यात आले. श्री. माने यांच्यासमवेत भाजपाचे तालुकाध्यक्ष दादा दळी यांनाही आफळेबुवांच्या हस्ते सन्मानित केले.
बाळ माने यांचा वाढदिवस १० जानेवारी रोजी असतो. काही वर्षांपूर्वी त्यांचा वाढदिवस आणि कीर्तनसंध्या महोत्सवाच्या तारखा एकच येत होत्या. त्यावेळी बाळ माने यांचा महाजन क्रीडा संकुलावर तीन दिवस कार्यक्रम होणार होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर बाळ माने यांनी माझा वाढदिवस महत्वाचा नाही तर मनामनांत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारा कीर्तनसंध्या महोत्सव झाला पाहिजे, हे त्यांनी आनंदाने सांगितले व त्या वर्षीचा महोत्सव उत्साहात झाल्याची आठवण निवेदक निबंध कानिटकर यांनी सांगितली.