मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्याला आजपासून सुरुवात, रोजाचं महत्त्व का आहे?…

Spread the love

मुस्लिम बांधवांमध्ये रमजान महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो. रमजान महिन्यात मुस्लिम हे दिवसभर रोजा म्हणजे उपवास करतात. रमजानमध्ये गरिबांना मदत करणं आणि मानवतेनं वागणं याला महत्त्व आहे.

नवी दिल्ली Ramadan 2024 – इस्लामिक कॅलेंडरनुसार रमजान हा नववा महिना आहे. त्यानंतर शाबान हा महिना येतो. चंद्रोदयानुसार इस्मालिक कॅलेंडरमध्ये दिवस आणि महिना निश्चित केला जातो. भारतात रमजान हा महिना हा १२ मार्चला सुरू झाला. या महिन्यात ईश्वरसेवा ( इबादत) आणि गरजुंना मदत करण्याचे (सदका-जकात) विशेष महत्त्व मानलं जातं. एवढेच नाही तर त्याशिवाय नमाज ( प्रार्थना) ही ईश्वराकडून स्वीकारली जात नाही, असं मानलं जातं.

▪️रमजान महिन्यात पुण्याचं एक काम करणं म्हणजे इतर महिन्यात ७० पुण्याची कामं करण्यासारखं असतं, असे मुस्लिम धर्मगुरू सांगतात. या महिन्यात ईश्वराची सेवा आणि प्रार्थना लवकर स्वीकारली जाते, अशी मुस्लिम बांधवांची श्रद्धा आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवाकंडून झालेल्या चुकाबद्दल माफी आणि भलं व्हावं अशी रमजानमध्ये प्रार्थना केली जाते.

🔹️काय असतो रोजा, सहरी, इफ्तार आणि तरावीह…

▪️रमजानमध्ये उपवासादरम्यान (रोजा) लोक सकाळी सहरी म्हणजे रोजापूर्वी नाष्टा करतात. हा नाष्टा सुर्योदयापूर्वी किमान दीड तास केला जातो. सहरीनंतर रोजाची सुरुवात होते. त्यानंतर दिवसभरात कोणतेही अन्न-पेय घेतलं जात नाही. सुर्यास्त होताना फलाहार किंवा इतर पदार्थ खाऊन उपवास सोडतात. त्याला इफ्तार म्हटलं जातं.

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध नेत्यांनी रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

🔹️रोजा करण्यासाठी काय आहेत नियम…

▪️रमजान महिन्यात ईश्वराची प्रार्थना आणि परोपकाराचं महत्त्व असते. त्यामुळे या कालावधीत तन-मन-कर्म आणि वाणीवर संयम ठेवावा लागतो. दुसऱ्यांना दु:ख देऊ नये.

▪️मुस्लिम बांधवांचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणचे पठण करण्याचं महत्त्व मानलं जाते.

▪️मुस्लिम धर्मात दररोज किमान पाच वेळा नमाज करण्याचं महत्त्व आहे. या व्यतिरिक्त रमजानमध्ये रात्री सुमारे नऊ वाजता नमाज असतो. त्याला तरावीह म्हटले जाते.

▪️रमजानमध्ये आजारी व्यक्तीला रोजा न करण्यासाठी सूट दिली जाते.
गर्भवती आणि स्तनदा माता, वयोवृद्ध व्यक्ती यांनादेखील रोजा न करण्यासाठी सूट दिली जाते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page