मासिक पाळीमध्ये अनेकजणींना पोटदुखी आणि कंबरदुखी सहन करावी लागते. मासिक पाळीत पोट आणि कंबर दुखू लागल्यास ओवा तव्यावर गरम करून कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळतो.
ओवा, काळे मीठ, आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर करुन घ्यावी. हे चूर्ण घेतल्याने पित्त आणि उलट्यांcच्या त्रासामध्ये लगेच आराम मिळतो.
ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे दम्याच्या त्रास ओवा खाण्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी गुळासोबत दिवसातून दोनदा ओवा खा.
वजन कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर ठरतो. ओवा टाकून पाणी प्यायल्याने शरीराची पचन क्षमता वाढते. एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा रात्रभर भिजवून ठेवावा. सकाळी या पाण्यामध्ये एक चमचा मध घालून हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे.
गुडघे दुखत असल्यास ओवा गरम करावा आणि तो एका रुमालात बांधून घेऊन त्याने गुडघ्यांना शेक द्यावा. त्यामुळे गुडघ्यांना आराम मिळतो.
केस काळे करण्यासाठी देखील ओव्याचा वापर तुम्ही करू शकता. यासाठी दोन ते तीन कडीपत्त्याची पाने, दोन मनुका, एक चिमुट ओवा एक ग्लास पाण्यात उकळून घ्या. या पाण्यात साखर घालून दिवसातून एक ग्लास दररोज प्या. हळूहळू तुमचे केस काळे होतील.
सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.
सतत खोकला येत असेल तर ओव्याचे पाणी त्यावर अतिशय गुणकारी आहे. यासाठी पाण्यामध्ये ओवा घालून हे पाणी उकळून घ्यावे. नंतर थोडेसे काळे मीठ घालून ह्या पाण्याचे सेवन करावे.
ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.