भानू सप्तमीच्या दिवशी अशाप्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, करियरमध्ये मिळेल अपार यश..

Spread the love

भानु सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने शुभ फल प्राप्त होते. या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात काळे तीळ टाकावेत. तसेच पिवळी फुले व जवा अर्पण करा. यानंतर दिवा लावून आरती करावी. सूर्यदेवाची चालीसा आणि सूर्यकवच पठण करा. आणि शेवटी आनंद आणि समृद्धीची इच्छा आणि कामना करा.

भानू सप्तमीच्या दिवशी अशाप्रकारे करा सूर्यदेवाची पूजा, करियरमध्ये मिळेल अपार यश…भानू सप्तमी…

मुंबई : सनातन धर्मात प्रत्येक तिथीला स्वतःचे वेगळे महत्त्व सांगितले आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथीला भानु सप्तमी (Bhanu Saptami 2024) साजरी केली जाते. या दिवशी सूर्यदेवाच्या उपासनेचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या वर्षी भानु सप्तमी रविवार, 3 मार्च रोजी म्हणजेच उद्या येत आहे. रविवार असल्याने त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे. भानु सप्तमीला सूर्यदेवाची उपासना आणि तपश्चर्या केल्याने व्यवसायात विशेष यश मिळते. घरात आनंद आणि करिअरमध्ये प्रचंड वाढ होईल. या दिवशी विशेष पूजा केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. जाणून घ्या भानू सप्तमीला कोणत्या पद्धतीने पूजा करावी.

भानु सप्तमीला अशी करा पूजा
भानु सप्तमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठणे शुभ मानले जाते. या दिवसाची सुरुवात सूर्यदेव आणि देवी-देवतांच्या ध्यानाने करावी. यानंतर आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे घाला. भानु सप्तमीच्या दिवशी या मंत्राचा जप करावा.

एही सूर्य सहस्त्रांशो तेजोराशे जगत्पते ।

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page