आमदार शेखर निकमांनी प्राप्ती हीचा सत्कार करत दिली कौतुकाची थाप
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावची सुकन्या कु. प्राप्ती जाधव हीने केवळ सहा महिन्यांच्या तयारीत दुबई येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. तिने केलेल्या या सुवर्ण कामगिरीने संंगमेश्वर तालुक्याचे नाव रोशन केले आहे.
प्राप्ती लिरिल जाधव ही संगणक अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्षात शिकत आहे. १७ वर्षीय प्राप्ती लिरिल जाधव गेल्या सहा महिन्यांपासून पॉवरलिफ्टिंग खेळाचा सराव करत होती. आतापर्यंत ५ वेळा खेळांमध्ये भाग घेतला आहे आणि सर्व पाचवेळा सुवर्णपदक जिंकले. जिल्हास्तरीय मेहसाणा नंतर वडोदरा, सुरत, जम्मू काश्मीर येथे पॉवरलिफ्टिंगमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. तिची आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबईसाठी निवड झाली. दुबईत दोन गटात सुवर्णपदकही पटकावले आहे. प्राप्तीने एशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपच्या ज्युनियर गटात बेंच प्रेसमध्ये ५५ किलो आणि डेड लिफ्टमध्ये ११२.५ किलो वजन उचलले आणि ५६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
मेहसाणा (गुजरात) जिल्हयातील गणपत विद्यापीठात ही संगणक अभियांत्रिकी पदविका प्रथम वर्षात शिकणाऱ्या १७ वर्षीय संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब या गावच्या कु. प्राप्ती लिरिल जाधवने दुबई, यूएई येथे नुकत्याच झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये डेड लिफ्ट आणि बेंच प्रेस प्रकारात दोन सुवर्णपदके जिंकून (गुजरात) मेहसाणा जिल्ह्याचे व (महाराष्ट्र) रत्नागिरी जिल्ह्याचे, संगमेश्वर तालुक्याचे व कोसुंब गावचे राष्ट्रीय स्तरावर नाव कोरले आहे तसेच जिल्हास्तरीय मेहसाणा नंतर वडोदरा, सुरत, जम्मू काश्मीर येथे पॉवरलिफ्टिंग मध्ये सुवर्णपदक जिंकले. याबद्दल तिने म्हटले कि, प्रशिक्षक पुजारा यांनी पॉवरलिफ्टिंगची संपूर्ण माहिती दिली आणि सराव कसा करावा या विषयीही माहिती दिली. सुवर्णपदकापर्यंत सतत मार्गदर्शन केले. त्यामुळे आज मी सुवर्णपदक जिंकले आहे. गणपत विद्यापीठानेही आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे दुबईला जाऊन मेहसाणाचे आणि कोसुंबचे नाव उज्ज्वल करू शकले.
कु. प्राप्ती लिरिल जाधव ही गौरवास्पद कामगिरी करुन ग्रामदैवत जुगाई देवी व देवी भवानी यांच्या दर्शनासाठी गावाला आली त्यादरम्यान आमदार शेखर निकम यांनी संपर्क कार्यालय, सावर्डे, ता. चिपळूण येथे तिचा सन्मापुर्वक सत्कार केला, तिच्याशी व तिच्या आई-वडीलांशी संवाद साधला या खेळाविषयी जाणून घेतले, तिला मिळालेले सुवर्ण पदक कौतुकाने पाहीले व या केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गौरवास्पद उद्गार काढत पुढील स्पर्धेत यशस्वी कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याप्रमाणे या खेळासाठी प्रोत्साहन देणारे तिचे आई-वडील, तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक व तिला सहकार्य करणारे विद्यापिठ यांचे सुद्धा अभिनंदन करुन कौतुक केले व याबाबत आपणास माझेही सहकार्य असेल असे सांगितले. यावेळी मिलिंद यशवंतराव, प्रज्वल जाधव, अमित जाधव, देवराज गरगटे, नरेंद्र जाधव, अमित जाधव (गुजरात), प्राप्ती जाधव हीचे आई-वडील आदि उपस्थित होते.