नेरळ : सुमित क्षीरसागर
जिल्ह्यातील दुसरी आर्थिक व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी असलेली कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये मोठे वादंग निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीमधील पुरुष सदस्यावर थेट महिला सदस्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याविरोधात पीडित सदस्याने नेरळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर दरम्यानची संबंध घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर कायद्याची चौकट मोडून वागणाऱ्या संबंधित लोकप्रतिनिधी विरोधात पद निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित सदस्य विजय हजारे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. दिनांक ३० जानेवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायत कार्यालयात घडलेल्या प्रकारची माहिती देण्यासाठी आज दिनांक २ फेब्रुवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांनी त्यांच्या कोल्हारे येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हजारे यांनी सांगितले कि दिनांक ३० जानेवारी रोजी कोल्हारे ग्रामपंचायतीची मासिक सभा ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केली होती. मासिक सभेचे व्हिडिओ चित्रण व्हावे असा ठराव झालेला असताना त्या दिवशी व्हिडिओ चित्रणाची सोय नव्हती. ते का नाही ? असा प्रश्न मी उपस्थित केला असताना आज व्हिडिओ चित्रण होणार नाही असे सरपंच यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर माझं कुठलाही म्हणणं ऐकून घेतलं नाही. माझ्या मागणीनुसार सुरवातीला इतिवृत्त वाचण्यास सुरुवात केली. मात्र काही मुद्द्यांवर मी आक्षेप घेतला. त्यात घर भावाच्या नावावर करण्याचा अर्ज होता. त्यावर तो अर्ज नामंजूर करण्यात आला.तो का नामंजूर केला असा प्रश्न विचारला तर त्यावर उत्तर दिले नाही. सरपंच यांनी उद्धटपणे अर्ज नामंजूर असे सांगितले. त्यांनतर बोलताना काही महिला सदस्यांनी तुम्ही सरपंच महेश विरले यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केल्याचे म्हटले. मात्र मी त्यावर शांतपणे सांगितले कि मी कुठे असं म्हटलं त्याचा पुरावा द्या मी राजीनामा लगेच देतो. मात्र त्यानंतर त्यांनी थेट माझ्यावर हात उचलला. त्यामुळे हा माझ्यासाठी सापळा रचण्यात आल्याचे मला समजले म्हणून मी थेट खाली उतरलो. तर मी महिलांचा आदर करतो त्यामुळे मी एक शब्द देखील न बोलता घरी निघून आलो. मात्र मी ग्रामपंचायत सभागृहातून खाली उतरताना तेथील महिला उपसरपंच साक्षी विरले, व महिला सदस्य नूतन पेरणे, अस्मिता विरले, गीता मोरे यांनी माझ्यावर धावून येत चप्पल फेकून मारली. हे सगळं सुरु असताना सरपंच महेश विरले, व सदस्य रोशन म्हसकर हे शांतपणे बसून होते मात्र त्यांनी महिलांना थांबवले नाही. तर हा सगळं प्लॅन सरपंच महेश विरले यांनीच केला कारण त्यांचा माझ्यावर राग आहे. त्यांच्या अनधिकृत इमारतीला ना हरकत दाखला दिला होता. त्यावर मी आवाज उठवला होता. त्यांनतर महेश विरले हे सरपंच झाल्यावर त्यांनी अनेक ना हरकत दाखले अनधिकृत रित्या दिले त्यावर देखील हरकत नोंदवली होती. त्यामुळे त्यांनीच जाणूनबुजून महिलांना माझ्यावर हल्ला करण्यास सांगितल्याचा आरोप हजारे यांनी केला आहे. दरम्यान याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत हजारे यांनी तक्रार दिली असून नेरळ पोलीस या प्रकरणाचा तपस करत आहेत. तर हि संबंध घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. तर हजारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याने भारतीय जनता पार्टी महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव मृणाल खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष बिनिता घुमरे, कर्जत तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, महिला नेरळ शहराध्यक्ष श्रद्धा कराळे आदींनी यावेळी हजारे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान माझ्यावर असा भ्याड हल्ला करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार त्यांचे पद रद्द करण्याची मागणी मी करत आहे. संबंधितांवर कारवाई झाली नाही नाही तर मी आत्मदहन करेन असा इशारा यावेळी विजय हजारे यांनी दिला आहे.
जाहिरात
जाहिरात