
भाजपा नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शिफारशीवरून पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा नियोजन मधून दिला निधी.
संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथील मुख्य रस्ता ते खालचे भराडे रामवाडी रस्त्याचे काम गेली अनेक वर्षे रखडल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती.अनेक वर्षे एकनिष्ठ राहून देखील या रस्त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येत होते.ग्रामस्थांनी अनेकवेळा नेत्यांची भेट घेऊन देखील त्यांना यश मिळत नव्हते.
त्यामुळे गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ मंगेश सुर्वे यांनी याकडे लक्ष टाकून भाजपा नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण यांची मुंबई मध्ये भेट घेऊन सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती.तसेच यासाठी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,संगमेश्वर तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या माध्यमातून श्री.सुर्वे यांचा पाठपुरावा सुरू होता.
लोकांची गरज लक्षात घेऊन मंत्री रविंद्रजी चव्हाण यांनी या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून तीस लाखाचा निधी द्यावा अशी शिफारस पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे मागील महिन्यात केली होती.त्यानंतर श्री.सुर्वे यांच्या चव्हाण साहेब यांच्याकडील सततच्या पाठपुराव्यानंतर सदर रस्त्याला तीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच लोकांचा वनवास यामुळे संपुष्टात येणार आहे.
यासाठी पाठपुरावा करणारे मंगेश सुर्वे यांनी याबद्दल भाजपा नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण,पालकमंत्री उदयजी सामंत तसेच भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,संगमेश्वर तालुका अध्यक्ष विनोद म्हस्के,सरचिटणीस डॉ.अमित ताठरे यांचे आभार मानले.