मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथराव शिंदे यांची राज्यातील टोल नाक्यांबाबत आणि दुकानांवरील मराठी पाट्या संदर्भात भेट घेतली

Spread the love

ठाणे : निलेश घाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री.राजसाहेब ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथराव शिंदे यांची राज्यातील टोल नाक्यांबाबत आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत करण्याबाबत चर्चा केली. या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघातील पुढील प्रलंबित विषयांवर मा.मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली.

• एमएमआरडीए कडून कल्याण ग्रामीण भागातील एमएमआर क्षेत्रात येणाऱ्या बाह्य रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देणेबाबत – ६९.५५ कोटी.

• कल्याण डोंबिवली महानगपालिका हद्दीतील महत्त्वाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रातील मुंबई नागरिक पायाभूत सुविधा प्रकल्पांअंतर्गत १८ गावांमध्ये अंतर्गत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत- १०० कोटी

ठाणे-गायमुख कोस्टल रोडच्या सर्व्हेक्षणासोबतच मुंब्रा-दिवा-कोपर-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे सर्व्हेक्षण करुन आराखडा तयार करणेबाबत.

• जिल्हा खनिज प्रतिष्ठान ठाणे, खनिज विकास निधी माझ्या मतदारसंघातील शाळांच्या कामांकरिता निधी मिळणेबाबत – ८ कोटी

• कल्याण-डोंबिवली महानगरपालिका जि.ठाणे क्षेत्रातील खालील कामांना मुलभूत सोयी-सुविधा योजनेअंतर्गत मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन देणेबाबत रुपये १० कोटी.

• ठाणे जिल्ह्यातील १४ महसुली गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अंतिम अधिसुचना काढून लवकरात लवकर समावेश करणेबाबत.

• कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येकरिता उल्हासनदी पात्रातून नवी मुंबई महानगरपालिकेस व्यपगत होणारा १४० द.ल.लि. प्रतिदिन पाणी कोटा कल्याण डोबिवली मनपासाठी वर्ग करुन उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये होणाऱ्या जलसाठ्यावर पाणी आरक्षण मिळण्याकरिता तातडीने बैठक आयोजित करण्याबाबत.

दिवा, पलावा, मानकोली व ठाकुर्ली येथील रखडलेल्या पुलांच्या कामासंदर्भात.

• पलावा चौकातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास होत असलेली दिरंगाई

• अमृत पाणी पुरवठा योजनेमधील कामे अद्यापही प्रलंबित

• रेल्वेस्टेशन परिसरातील १५० मिटर मधील अनधिकृत फेरीवाले

आगासनमधील (ठाणे महानगरपालिका) खाजगी जमिनींवर टाकलेले आरक्षण

• डायघरमधील कचरा प्रकल्पाचे पूर्णपणे काम झाले नसतानाही प्रकल्प सुरु झाल्यामुळे प्रदूषणाचा स्थानिकांना त्रास होत असून त्याला असलेला स्थानिकांचा विरोध

• कल्याण शिळफाटा रस्त्यावरील बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासंदर्भात

आदी विषयांवर आज मुख्यमंत्री महोदयां सोबत चर्चा करण्यात आली यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीवर मार्ग काढू असे आश्वासन दिले.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page