मनसे आमदार राजू पाटील यांच्या निधीतून दिव्यात रस्ते कामाचा शुभारंभ

Spread the love

ठाणे : निलेश घाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून दिव्यात आज ठाणे महापालिका अंतर्गत दिवा प्रभाग समिती साबे रोड येथील साई इमारत ते सीताराम निवास आणि गौरी निवास ते ओम साई इमारत गटार व रस्त्याचे कॉक्रेटीकरन करण्याचा भूमिपूजन सोहळा जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहराध्यक्ष तुषार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले दिव्यातील रस्ते कामाचा धडाकाच पाटील यांनी लावला असून दिवा शहरात बहुसंख्य इमारती व बैठ्या चाळी मध्ये येण्या जाण्यासाठी नागरीकांना चागल्या दर्जाचे रस्ते नाहीत ही बाब दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील यांनी निदर्शनास आणून देत आमदार पाटील यांनी निधी उपलब्ध करून देत ठाणे महापालिका अंतर्गत पुढे अनेक रस्त्यांचे कॉक्रेटीकरण करून रस्ते व गटारचे मजबुतीकरण करून सुस्सज करू असे यावेळी तुषार पाटील यांनी स्पष्ट केले. प्रसंगी दिव्यातील शहर सचिव प्रशांत गावडे, म.न.वि.से शहर अध्यक्ष कुशाल पाटील, विभाग अध्यक्ष, देवेंद्र भगत, शरद पाटील, प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील तसेच सर्व शाखाध्यक्ष, महिला पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page