संगमेश्वर भाजपा तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के यांच्या माध्यमातून शृंगारपुरवासियांच्या पंढरपूर यात्रेस प्रारंभ.

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | नोव्हेंबर १८, २०२३.

संगमेश्वर (उत्तर) भाजपा तालुकाध्यक्ष श्री. विनोद म्हस्के यांनी शृंगारपुर गावचा सुपुत्र म्हणून आपले कर्तव्य समजून गावातील ग्रामस्थांना कार्तिकी एकादशीच्या पवित्र पर्वावर पंढरपूर यात्रा घडवून आणण्यास मागील वर्षी सुरुवात केली. हीच परंपरा कायम राखत श्री. म्हस्के यांनी यावर्षीही पंढरपूर यात्रेचे आयोजन केले असून आज शनिवार दि. १८ नोव्हेंबर रोजी गावातील ५० भाविक पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाचे डोळे भरून दर्शन घेण्यास रवाना झाले आहेत.

हिंदू परंपरेत भागवत धर्माची भगवी पताका (ध्वज) घेऊन जाणारे वारकरी देवासमान मानले जातात. कोकणात वारकरी परंपरा आता खोलवर रुजत आहे. अशात युवा कार्यकर्ते व नेते श्री. विनोद म्हस्के यांच्या पुढाकाराने सलग दुसऱ्या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले असून धार्मिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल स्तुती केली आहे. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page