संगमेश्वर:- कार्तिक एकादशी वारीनिमित्त १८ नोव्हेंबर रोजी शृंगारपूर येथून ४० वारकऱ्यांची एक बस विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे रवाना झाली आहे .
गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील युवा उद्योजक भाजप उत्तर संगमेश्वर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के यांनी स्वखर्चाने बस उपलब्ध करुन दिली आहे .
म्हस्के यांच्या सोबत किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे , कारभाटले गावचे सरपंच दिनेश मालप , शृंगारपूर मधून गजानन म्हस्के , दीपक म्हस्के , प्रमोद साळुंके आणि गावातील ४० भाविकांचा समावेश आहे . मुंबई येथील शृंगारपूरस्थित चाकरमानी यांनी या सर्व भाविकांची ५ दिवस निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे . कार्तिकवारी घडविल्याबद्दल भाविकांनी विनोद म्हस्के यांच्यासह मुंबईकर चाकरमान्यांना धन्यवाद दिले आहेत .