कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 15 नोव्हेंबर 2023च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.
मेष :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो.
वृषभ :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो कारणी लागेल. आर्थिक लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. कामात यश मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. खोळंबलेली कामे पूर्ण होतील. संतापाचे प्रमाण मात्र वाढेल. विनाकारण संताप व्यक्त केल्यास आपले काम बिघडण्याची शक्यता आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.
कर्क :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल किंवा अबोला धरला जाईल. एकादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
सिंह :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आपल्या वक्तव्याने गैरसमज वाढतील व आपले मन उदास होईल. आईशी मतभेद होतील व तीच्या प्रकृतीची काळजी वाटत राहील. सरकारी व मालमत्तेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी.
कन्या :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. मित्र व स्वकीयांशी सुसंवाद साधू शकाल. प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा होतील. समाजात मान – सन्मान प्राप्त होईल.
तूळ :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबियांशी होणारे संभाव्य वाद टाळू शकाल. हट्टीपणा सोडून सर्वमान्य मार्ग स्वीकारणे हितावह राहील.
वृश्चिक :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल. प्रवास सुखद होतील.
धनू :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
मकर :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. घरात एखादे मांगलिक कार्य होईल.
कुंभ :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल.
मीन :
चंद्र आज 15 नोव्हेंबर 2023 बुधवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील