चिपळूण : समीर मोरे मनसे पक्षाचे नेते मा.श्री. शिरीषजी सावंत सो., मा. श्री. नितीनजी सरदेसाई सो., मा.श्री. अविनाशजी जाधव सो. मध्य रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी चव्हाण सो.यांचे मार्गदर्शनाने उपतालुका अध्यक्ष श्री. उदय घाग यांच्या नेतृतत्वा खाली चिपळूण तालुक्यातील मनसे सावर्डे विभागातील सावर्डे महामार्ग ६६ मुंबई ते गोवा आरती स्विट्स समोरील महामार्ग खचला असून वाहनचालक यांना वाहन चालवण्यात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यात महामार्गावर धुळीचे साम्राज्य असल्यामुळे वाहनाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत महामार्गाचे कामकाज अश्याच प्रकारे चालु राहिले तर भविष्यात सावर्डे येथील महामार्ग क्र.६६ वर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता महामार्गावरील डाग-डूजीचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावर्डे येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सदर घटनेबाबत पं .स.गण विभाग अध्यक्ष सागर जंगम सावर्डे शाखा अध्यक्ष संतोष जंगम उप शाखा अध्यक्ष राज राठोर सावर्डे विभाग प्रसार माध्यम अध्यक्ष सांरग गुरव या प्रसंगी निवेदन देण्यात आले, याप्रसंगी माथाडी कामगार सेनेचे चिटणीस माननिय श्री.रवींद्र काणेकर दहिवली शाखा अध्यक्ष श्री. विश्वनाथ खाडे. महाराष्ट्र सैनिक श्री.जितेंद्र महाडिक. कू.सुरज भिमराव जंगम. कू.प्रफुल जाधव. इत्यादी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजर होते.
जाहिरात
जाहिरात