रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न…

Spread the love

रत्नागिरी- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठ, दापोली अंतर्गत ‘झाडगाव रत्नागिरी येथे असलेल्या ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ मध्ये ‘मत्स्यालय व्यवस्थापन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम १ ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रम आयोजनाकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे, शिक्षण संचालक डॉ. प्रशांत बोडके, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचा उद्घाटन बुधवारी झाले. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विशेषतः खेड-रत्नागिरी, सावंतवाडी, रायगड, ठाणे, विरार, तारापूर-पालघर, बोईसर, गडहिंग्लज, कोल्हापूर, आंबेगाव-पुणे, वसई, जळगाव, मुंबई, नवी मुंबई, सिंधुदुर्ग, व रत्नागिरी येथील प्रशिक्षणांर्थीनी आणि विशेष म्हणजे गोवा राज्यातील बिचोली तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून प्रशिक्षणांर्थीनी सहभाग नोंदविला.

प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत तीन दिवसात शोभिवंत माशांच्या जातींची ओळख, मत्स्यालय व्यवस्थापन, जिवंत खाद्याचे प्रकार आणि तयार करण्याच्या पद्धती, पाण्याचे गुणधर्म आणि व्यवस्थापन, खाद्य बनविणे, रोग व उपाय, शोभिवंत माशांची काढणी, पॅकींग व वहातुक व्यवस्थापन, शोभिवंत पान-वनस्पतींच्या अभिवृद्धी पद्धती, शोभिवंत मासे बिजोत्पादन केंद्र बांधणी, शासनाच्या अनुदान योजना या विषयावर तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बार्ब, डॅनिओ मासे, गोल्डफिश, कोई मासे, गप्पी मासे, एंजल, डिस्कस माशांच्या प्रजनन पद्धती यावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्राशिक्षण दरम्यान जास्तीत जास्त प्रात्यक्षिकवर भर देण्यात आला. प्रशिक्षणार्थीनी स्वतः मत्स्यालय टाकी बनविणे, खाद्य बनविणे, पाण्याची प्रत तपासणे अशी प्रात्यक्षिक अनुभवलीत. यावेळी ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र’ रत्नागिरीचे डॉ. आशिष मोहिते, डॉ. आसिफ पागारकर, डॉ. हरिष धमगये, प्रा. नरेंद्र चोगले, डॉ. संतोष मेतर, प्रा. सचिन साटम, प्रा. कल्पेश शिंदे, वर्षा सदावर्ते आणि रमेश सावर्डेकर यांनी मार्गदर्शन केले. कोंकण कृषी विद्यापीठाचे मुळदे येथील मत्स्य संशोधन केंद्राचे डॉ. एम.एम. घुगुस्कर आणि श्री. कृपेश सावंत यांनी देखील प्रशिक्षणार्थिना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या मॅनग्रुव्ह फाउंडेशन प्रकल्पाचे रत्नागिरी येथील प्रणव बांदकर यांनी देखील मार्गदर्शन केले. रत्नागिरी येथील मत्स्य व्यवसाईक सुयोग भागवत तसेच शोभिवंत मासे (एंजल आणि डिस्कस मासे) प्रजनन करणारे गौरव आठल्ये, तसेच हर्णे-दापोली येथील शोभिवंत मासे (गप्पी मासे) प्रजनन करणारे फहाद जमादार यांनी प्रशिक्षणार्थीना स्व-अनुभव कथनाद्वारे मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रक्षेत्र भेट ही मॅनग्रुव्ह फाउंडेशन प्रकल्प अंतर्गत मिऱ्या, रत्नागिरी येथे असलेला सुरज शिरधनकर यांचा सागरी शोभिवंत मासे पालन प्रकल्पावर देण्यात आली. प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोपवेळी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली-हर्णे येथील शोभिवंत मासे व्यावसायिक फहाद जमादार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. फहाद जमादार यांनी मार्गदर्शन करताना प्रशिक्षनार्थीना आपण मदत करण्यास सदैव तयार असल्याचे सांगितले. त्यांनी शोभिवंत मत्स्य व्यवसाय मध्ये मार्गदर्शन करिता प्रशिक्षनार्थिनी निसंकोष संपर्क करण्याचे आव्हान केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांनी तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे फलित म्हणून या प्रशिक्षणार्थींनी या व्यवसायास आपले योगदान द्यावे असे आवाहन केले. त्यांनी आपले संशोधन केंद्र व सर्व शास्त्रज्ञ भविष्यात प्रशिक्षणार्थींना हवी असलेली तांत्रिक मदत करण्यास तत्पर असल्याचे आश्वासित केले. सर्व प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते यशस्वी सहभाग बद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page