डॉ.ज्योती यादव यांना राष्ट्रीय आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार मिळाल्याबाबद्दल आमदार शेखरजी निकम सर यांनी दिल्या शुभेच्छा..

Spread the love

चिपळूण – बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती यादव यांना राष्ट्रीय आदर्श वैद्यकीय सेवा गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.गेल्या अनेक वर्षापासून डॉ.यादव या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

सध्या त्या तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावत असून निराधार फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.यानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखरजी निकम सर सोबत डॉक्टर श्री.अब्बास जबले,माजी सभापती श्री.पांडुशेठ माळी,माजी सभापती श्री.शरद शिगवण,श्री.संजय जाधव,श्री.उमेश सकपाळ,डॉक्टर श्री.सानप,श्री.तुषार गमरे,श्री.भालचंद्र पाचांगने,श्री.संकल्प सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page