पाव भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडते.अनेक जण वीकेंड आला की घराबाहेर पडतात आणि बाहेरची पावभाजी आवडीने खातात. आज आम्ही तुम्हाला पावभाजी घरी कशी बनवायची, हे सांगणार आहोत.
साहित्य
- कांदा
- टोमॅटो
- फ्लॉवर
- बटाटा
- वाटाणे
- शिमला मिरची
- आलं लसणाची पेस्ट
- लाल मिरची पावडर
- पावभाजी मसाला
- कोथिंबीर
- तेल
- तूप
- मीठ
- कृती
- बारीक चिरलेली शिमला मिरची, टोमॅटो, फ्लॉवर आणि बटाटा घ्या. त्यात वाटाणे टाका.
- कुकरमध्ये थोडं तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यात या सर्व भाज्या टाका. या भाज्या तेलामध्ये परतून घ्याव्यात.
- त्यानंतर त्यात पाणी टाका आणि कुकरमध्ये सर्व भाज्या मध्यम आचेवर तीन शिट्ट्या होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.
- शिजलेल्या भाज्या रईने एकजीव करुन बारीक पेस्ट करुन घ्या.
- एका कढईत तेल घ्या
- तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकावा.
- कांदा चांगला परतून घ्यावा
- त्यात आलं लसणाची पेस्ट टाका. त्यात लाल मिरची पावडर टाका
- त्यानंतर त्यात पावभाजी मसाला टाका.
- हे सर्व मसाले चांगले परतून घ्या आणि त्यात थोडे पाणी घाला.
- मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात पेस्ट केलेल्या भाज्या टाका आणि एकजीव करा.
- भाजी जास्त घट्ट होऊ नये म्हणून प्रमाणानुसार पाणी घाला.
- त्यात चवीनुसार मीठ आणि तूप घाला
- पाच मिनिटे पावभाजी शिजू द्या
- गरमा गरम पावभाजीवर कोथिंबीर घाला आणि गरमा गरम पावबरोबर ही भाजी सर्व्ह करा