Breaking News वांगणी-बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड; सी.एस.टी.म लोकल खोळंबल्या

Spread the love

ठाणे: रविवारचा दिवस असला तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांनसाठी महत्वाची बातमी.

वांगणी-बदलापूर अप लाईनच्या ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. 

ही सकाळी ८ च्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे अनेक  मध्य रेल्वेच्या लोकल वांगणी-बदलापूर भागात अडकल्या आहेत. तसेच कर्जत सीएसएमटी  लोकल वांगणीच्या पलिकडेच थांबविण्यात आल्या आहेत. बदलापूर/अंबरनाथ येथून लोकल कल्याण/सीएसएमटीकडे धावत आहेत. 

अप मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड असल्याने कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावर गाड्या धावत आहेत. रेल्वे कर्मचारी पोहोचले असून बिघाड दुरुस्त करण्यात येत आहे. 

• अप मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड असल्याने कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावर गाड्या धावत आहेत.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page