ठाणे: रविवारचा दिवस असला तरी कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांनसाठी महत्वाची बातमी.
वांगणी-बदलापूर अप लाईनच्या ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.
ही सकाळी ८ च्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला आहे. यामुळे अनेक मध्य रेल्वेच्या लोकल वांगणी-बदलापूर भागात अडकल्या आहेत. तसेच कर्जत सीएसएमटी लोकल वांगणीच्या पलिकडेच थांबविण्यात आल्या आहेत. बदलापूर/अंबरनाथ येथून लोकल कल्याण/सीएसएमटीकडे धावत आहेत.
अप मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड असल्याने कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावर गाड्या धावत आहेत. रेल्वे कर्मचारी पोहोचले असून बिघाड दुरुस्त करण्यात येत आहे.
• अप मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड असल्याने कल्याण ते कर्जत या डाऊन मार्गावर गाड्या धावत आहेत.
जाहिरात