वाशिष्ठी डेअरीच्या शॉपीचे महाडमध्ये शानदार उद्घाटन..

Spread the love

मान्यवरांची उपस्थिती; रायगड जिल्ह्यातही दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री सुरू

महाड : वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.च्या नवव्या शॉपीचे काल सायंकाळी महाड येथील चवदार तळे परिसरात मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले.

यावेळी अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन शोभाताई सावंत, पोलादपूरच्या माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी, महाडचे माजी उपनगराध्यक्ष संदीप जाधव, वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष प्रशांत यादव, रमण डांगे, पत्रकार सुभाष कदम, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, दिलीप जाधव, प्रसाद जाधव, पंकज जाधव, सौ. सुप्रिया जाधव, हेमंत डांगे, लिना डांगे, अजिंक्य डांगे, निता डांगे, निता जाधव, रंजना जाधव, डॉ. जितेंद्र बेल, दूध उत्पादक शेतकरी अनिल बेल, शेखर घाणेकर, पाटेकर ब्रदर्सचे महेंद्र पाटेकर, कदम बंधूचे दादा कदम, वाशिष्ठी डेअरीचे एरिया सेल्स मॅनेजर तानाजी निंबाळकर आदी उपस्थित होते.

वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि ने चिपळूण शहर आणि परिसरात आतापर्यंत आठ शॉपीज् सुरू केल्या आहेत. महाडमध्ये सुरू झालेली ही नववी शॉपी आहे. सर्वच शॉपींना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्हता यामुळे दुधासह वाशिष्ठी डेअरीची सर्वच उत्पादने अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यात दूध, दही, श्रीखंड, आम्रखंड, तूप, ताक, फ्लेवर्ड मिल्क, पनीर, बासुंदी, पेढा आदी उत्पादनांचा समावेश आहे. तसेच गणेश उत्सवानिमित्ताने विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या मोदकांनाही ग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता.

केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यांतूनही वाशिष्ठी डेअरीच्या उत्पादनांना मागणी वाढत आहे. रायगड जिल्ह्यातूनही होणारी मागणी लक्षात घेऊन महाडमध्ये शॉपी सुरू करण्यात आली आहे. आता वाशिष्ठी डेअरीची उत्पादने पोहचली आहेत. वाशिष्ठी डेअरीच्या सर्वच उत्पादनांना ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पवाधीतच वाशिष्ठी डेअरीचे नावलौकीक वाढत आहे. ग्राहकांचा हा विश्वास अखंड जपण्यासाठी उत्पादनांच्या दर्जाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही यावेळी वाशिष्ठी डेअरीचे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.

वाशिष्ठीची उत्पादने राज्यात सर्वदूर पोहोचावीत : शोभाताई सावंत

वशिष्ठी डेअरी प्रकल्पाबाबत खूप ऐकून होते. पण शॉपीच्या उद्घाटनानिमित्त प्रत्यक्ष माहिती घेता आली आणि उत्पादने पाहता आली. वाशिष्ठीची उत्पादने दर्जेदार आहेत. त्यामुळे नक्कीच महाडमध्ये वाशिष्ठीच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळेल. आपल्या कोकणातला हा एक उत्तम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची उत्पादने केवळ पुणे-मुंबईतच नव्हे तर राज्यात सर्वदूर पोहोचावीत, अशा शब्दांत यावेळी अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमन शोभाताई सावंत यांनी शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page