उत्तरप्रदेशमध्ये पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग; २ डबे जळून खाक; प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारून वाचवला जीव

Spread the love

आग्रा- उत्तरप्रदेशमधील आग्रातील भांडई रेल्वे स्थानकाजवळ पातालकोट एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही ट्रेन मथुरा येथून झाशीच्या दिशेने निघाली असतानाच आग लागली. ट्रेनचे २ डबे आगीच्या भक्ष्यस्थान आले आणि जळून खाक झाले. आग लागल्यानंतर प्रवाशांची आरडाओरड सुरु झाली होती. काही प्रवाशांनी तर जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उड्या मारल्या. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी दुपारी ही घटना घडली. भांडई रेल्वे स्थानकाजवळ पातालकोट एक्स्प्रेसला आग लागली. आग लागताच ट्रेन थांबवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. तात्काळ अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण ९ प्रवाशी आगीत होरपळले असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page