आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा, देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील रावण दहन कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०७ फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. पुतळा दहन करण्याआधी मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी जनतेला हे आवाहन केले.
नवी दिल्लीः आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा, देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दसऱ्याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील रावण दहन कार्यक्रमाला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०७ फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. पुतळा दहन करण्याआधी मोदींनी उपस्थितांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी जनतेला हे आवाहन केले.
भारत म्हणजे उत्सवांची भूमी आहे. भारतात प्रत्येक दिवशी उत्सव असतो. वर्षभरात कदाचित एखादा दिवस असेल त्या दिवशी आपण उत्सव साजरा करीत नाही. उत्सव आपल्याला जोडण्याचे काम करतात. उत्सव नवे-नवे स्वप्न सजवण्यासाठी शक्ती देत असतात. उत्सव आपल्या सामाजिक जीवनासाठी प्राण तत्त्व आहे. उत्सवासोबत विविध प्रकारची कला जोडलेली आहे. म्हणून भारतात रोबोट परंपरा निर्माण होत नाही.
तर जिवंत व्यक्ती निर्माण होतात. आईची उपासना शक्तीची साधना करणारा आपला देश आहे. त्यामुळे प्रत्येक आईचा, मुलीचा सन्मान, गौरव आणि तिची प्रतिष्ठा जपण्याचे, तिचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करणे ही आपली जबाबदारी आहे. दिवाळीत लक्ष्मीची पूजा आपण करतो, आपल्या मनात स्वप्न असतात. प्रत्येक घरात, गावात, शहरात मुलीच्या रुपात एक लक्ष्मी असते. म्हणून आपण ज्या मुलीनं मिळवलं आहे. ते आपल्याला प्रेरणा देणारे ठरायला हवे. सार्वजनिक कार्यक्रमात मुलीचा सन्मान करावा. तिच खरी आपली लक्ष्मी पूजन असायला हवी.
वायू दलाचा आज स्थापना दिवस आहे. या दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी वायूदलाला शुभेच्छा दिल्या. आज विजयादशमीचा सण आहे. तसेच वायू सेनेचा जन्मदिवस सुद्धा आहे. आपल्या देशाच्या वायू सेनेने ज्याप्रकारे पराक्रम केले आहेत. ते खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत. देशाची संपत्ती वाचवण्याचा संकल्प आज सर्वांनी करावा, असे आवाहन मोदींनी केले आहे. ज्यावेळी आपण महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करतो. त्यावेळी आपण देशासाठी एक चांगला संकल्प करायला हवा. जर मी पाणी वाचवण्याचा संकल्प केला. जेवण केल्यानंतर ताटात काही उरणार नाही, हाही एक संकल्प आहे. वीज वाचवणे हाही एक संकल्प आहे. देशाच्या संपत्तीचे कोणतेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेणे हाही एक संकल्प आहे, असे मोदी म्हणाले.