मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश.
ठाणे: निलेश घाग दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार ह्या बातमीला चर्चेला उधाण आले असता, आज शनिवार दुपारी माजी भाजपा दिवा अध्यक्ष श्री.रोहीदास मुंडे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला.
रोहिदास मुंडे हे दिव्याच्या सामान्य जनतेच्या विवीध प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना पाणी प्रश्न, अनधिकृत बांधकामे यावर चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते.
यावेळी शिवसेना नेते संजय राऊत,अरविंद सावंत,लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत,जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. रोहिदास मुंडे त्यांच्यासह सौ.राजश्री मुंडे,कल्पिता मुंडे,विकास इंगळे,नागेश पवार,प्रशांत आंबोणकर,मूर्ती मुंडे,शनिदास पाटील,संजय जाधव,बैद्यनाथ पाडी,अक्षय वनगुळे,सागर पवार,सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग,सचिन विश्वकर्मा, यांच्यासह दिव्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला.
आता रोहिदास मुंडे हे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला असल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष
पेटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. दिव्यातील विविध समस्यांवर ही त्यांनी आवाज उठवला आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सरकार मध्ये युती असली तरी मुंडेंनी शिंदेंच्या शिवसेनेला चांगलेले विविध प्रश्नांवर धारेवर धरले होते. तेच काम ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत येऊन करणार असे रोहिदास मुंडे यांनी सांगितले..
रोहिदास मुंडे हे दिव्याच्या सामान्य जनेतेच्या विविध प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत. भाजपचे अध्यक्ष असताना दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते. यापुढे रोहीदास मुंडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात