भारतीय जनता पार्टी उत्तर संगमेश्वर महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शितल दिंडे यांची निवड..

Spread the love

संगमेश्वर- भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (उत्तर) तालुक्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून महिला मोर्चा तालुकाध्यक्ष म्हणून धामापूर जिल्हा परिषद गटातील सौ. शीतल सचिन दिंडे यांची निवड झाली आहे. यापूर्वी महिला मोर्चामध्ये तालुका उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते, त्यांच्या कामगिरीचा आलेख आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची गुणवत्ता पाहून भाजपा रत्नागिरी (द.) जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव ,तालुका अध्यक्ष (उत्तर) श्री विनोद मस्के ,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी, , जिल्हा चिटणीस सौ. कोमलताई रहाटे तसेच जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांनी ही निवड केल्याचे जाहीर करण्यात आले.

तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानत आहे. मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल तालुकाध्यक्ष विनोद मस्के यांचे त्यांनी आभार मानले. महिलांच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तोपर्यंत प्रयत्न व काम करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात निवडणुका असून त्यामध्ये ही महिलांचा सक्रिय सहभाग नोंदवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी महिलांसाठी 33 टक्के आरक्षण विशेष अधिवेशनामध्ये मंजूर केले आहे. त्यामुळे महिलांना काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महिला म्हणून त्याने आभार मानले आहेत.

भारतीय जनता पार्टी ही तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे फार गरजेचे असून सर्व महिला पदाधिकाऱ्यांना एकत्र करून तालुका मध्ये भारतीय जनता पार्टी वाढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page