काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली फिटल ड्रॉपलर व दोन बीपी मशीन भेट…

Spread the love

आशासेविका व अंगणवाडी सेविकांना साडी भेट देऊन कोरोनामध्ये केलेल्या कामाबद्दल त्यांचे मानले आभार

देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील मुर्शी गावचे सुपुत्र व काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी आज गुरूवारी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मिशन आपुलकी अंतर्गत साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला फिटल ड्रॉपलर व दोन बीपी मशीन दिली. तसेच सर्व आशासेविका व अंगणवाडी सेविकांना साडी भेट देऊन कोरोनामध्ये केलेल्या अतुलणीय कामाबद्दल त्यांचे आभार मानले.

मुंबई येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक, नवी मुंबई येथील मा. उपमहापौर तथा नगरसेवक अविनाश लाड यांचा आज गुरूवारी वाढदिवस आहे. अविनाश लाड हे संंगमेश्वर तालुक्यातील मुर्शी गावचे सुपूत्र असून अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करून त्यांनी कष्टाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली आहे. समाजकार्याची प्रचंड आवड असलेल्या अविनाश लाड यांनी समाजकार्याबरोबर राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. याच कामाची पोचपावती म्हणून ते आज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मिशन आपुलकी अंतर्गत साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला फिटल ड्रॉपलर व दोन बीपी मशीन दिली. तसेच सर्व आशासेविका व अंगणवाडी सेविकांना साडी भेट देऊन कोरोनामध्ये केलेल्या कामाप्रति त्यांचे आभार मानले आहेत. तर याबद्दल अविनाश लाड यांचा आरोग्य केंद्रातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. व त्यांचे आभार मानण्यात आले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page