ग्रामीण कृषि मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दि. ४ ते ८ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान हवामान कोरडे राहून कमाल आणि किमान तापमानात क्रमशः वाढ संभवत असून आकाश निरभ्र राहील.
विस्तारित श्रेणी अंदाजानुसार (ईआरएफएस) कोकण विभागात दि. ५ ते ११ फेब्रुवारी, २०२३ दरम्यान हवामान कोरडे राहून कमाल आणि किमान तापमान हे सरासरी इर्के रहाण्याची शक्यता आहे.