देवरुख : रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन रत्नागिरी द्वारा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी देवरूख येथे ज्युनिअर व सब ज्युनिअर मुलांच्या कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण ९६ हून अधिक मुले,मुली सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन रत्नागिरी चे सचिव श्री मिलिंद साप्ते यांचे हस्ते श्रीफळ वाढऊन व उपाध्यक्ष श्री सुरेन्द्र देसाई यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.यावेळी राज्य पंच श्री मंदार दळवी, मयुर स्पोर्ट्स अकॅडमी देवरूख चे अध्यक्ष मनोहर गुरव,मोहन हजारे,योगेश मोहिरे,माजी कॅरमपटू बाबा जाधव,आधी उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये
१२ वर्षाखालील मुलांचे गटात प्रथम विजेता स्मित कदम, उप विजेचा हर्ष कदम
मुलींचे गटामध्ये विजेती निधी सप्रे तर उप विजेती सृष्टी चवंडे,
१४ वर्षाखालील मुलांचे गटात विजेता द्रोण हजारे,उप विजेता भूषण सावंत तर मुलींचे गटात विजेती स्वरा मोहीरे व उप विजेती सेजल जाधव तसेच १८ वर्षाखालील मुलांचे गटात ओम पारकर व उप विजेता रोहन शिंदे तर मुलींचे गटात विजेती गुंजन खवळे तर उप विजेती मृगजा जुवेकर ठरली.स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी कॅरमपटू श्री दिलीप विंचू,जिल्हा कॅरम असोसिएशन चे सचिव मिलिंद साप्ते,राज्य पंच श्री मंदार दळवी, यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी योगेशमोहीरे,योगेशकोंडविलकर ,संजय,विजय आधी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेची बक्षिसे मयुर स्पोर्ट्स अकॅडमी देवरूख यांच्या तर्फे देण्यात आली.स्पर्धे ला रॉयल एंटरप्राईझेस,अविनाश स्पोर्ट्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले.स्पर्धेच्या आयोजनात माजी कॅरमपटू मोहन हजारे यांनी परिश्रम घेतले.शेवटी विजेते,उप विजेत्या मुलांचे अभिनंदन करण्यात आले व मान्यवरांचे मोहन हजारे यांनी आभार मानून स्पर्धा संपल्याचे जाहीर केले.