दिवा : मनसे दिवा शहर अध्यक्ष श्री.तुषार भास्कर पाटील यांच्या सूचनेनुसार आज दिवा शहरातील मुंब्रादेवी कॉलनी येथील आपला शिवम मार्ट या दुकानाचे मराठी नामफलक हे इतर भाषेंपेक्षा लहान होते. यासंदर्भात प्रभाग क्रमांक. ४३ विभाग अध्यक्ष श्री.देवेंद्र अशोक भगत यांनी दुकानदाराला निवेदन दिले व येत्या २० दिवसांच्या आत मराठी अक्षर हे मोठे व ठळक करण्यात यावे अशी त्यांना समज दिली. त्यानंतर दुकानदाराने देखील शब्द दिला की १५ दिवसांच्या आत नामफलक बदली करण्यात येईल.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात