
हँगझोऊ- 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आज सहाव्या दिवशी भारताने आतापर्यंत 5 पदके जिंकली आहेत. चीनमधील हांगझोऊ येथे शुक्रवारी भारतीय नेमबाजांची चमकदार कामगिरी सुरूच आहे. नेमबाजांनी आज 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदक जिंकले. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.
यासह भारताने 30 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 8 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. चीन 173 पदकांसह पहिल्या, दक्षिण कोरिया 88 पदकांसह दुसऱ्या आणि जपान 82 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

नेमबाजी: 10 मीटर एअर पिस्तूल 3 पोझिशन आणि 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये एक पदक मिळाले
भारताला 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत सहाव्या दिवशी पहिले पदक मिळाले. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांनी १७३१ स्कोअर करत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत चीनचा संघ अव्वल राहिला. चीनच्या संघाने १७३६ स्कोअर करून सुवर्णपदक जिंकले. तर चायनीज तैपेई संघाने १७२३ स्कोअर करून कांस्यपदक जिंकले.
पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारताचे 7 वे सुवर्ण मिळवले. ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शिरोन आणि स्वप्नील सुरेश यांनी १७६९ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. नेमबाजीतील भारताचे हे पाचवे सुवर्ण आहे. या स्पर्धेत चीनच्या संघाने १७६३ गुणांसह रौप्यपदक तर दक्षिण कोरियाने १७४८ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
पलकने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत 242.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी तिने सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
पलकने 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत 242.1 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी तिने सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.
टेनिस: पुरुष दुहेरीत रौप्य
टेनिसमध्ये आज पुरुष दुहेरीत भारताला रौप्यपदक मिळाले. भारतीय जोडी साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चायनीज तैपेईच्या जेसन आणि यू-ह्स्यू यांनी साकेथ आणि रामकुमार यांचा 6-4,6-4 असा पराभव केला.
याशिवाय मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीचा उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंशी सामना होणार आहे. या जोडीसाठी पदकही निश्चित आहे.
भारताच्या रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीने टेनिस पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.
भारताच्या रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी या जोडीने टेनिस पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.
स्क्वॅश: भारतीय संघांचे उपांत्य फेरी भारतीय महिला संघाचा सामना हाँगकाँगशी, तर पुरुष संघाचा सामना मलेशियाशी होणार आहे. जिंकल्यास हे संघ विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करतील.

ॲथलेटिक्स : आजपासून स्पर्धा, पदके मिळू शकतात एशियाडमध्ये आजपासून ॲथलेटिक्स स्पर्धा सुरू होत आहेत. खेळाडू देशासाठी एकापेक्षा जास्त पदके जिंकू शकतात. भारतीय खेळाडू आज 4 प्रकारांच्या अंतिम फेरीत खेळतील. यापैकी ऑलिम्पियन प्रियांका गोस्वामी, मोहम्मद अनस आणि मनप्रीत यांच्यावर नजर असेल.
बॉक्सिंग: निखत पदक निश्चित करू शकते स्टार बॉक्सर निखत जरीन आज महिलांच्या ५० मीटर प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या असर एस विरुद्ध खेळणार आहे.