अमेरिका- परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला संबोधित करणार आहेत. दरम्यान, त्यांनी काल संयुक्त राष्ट्राचे सचिव आन्तोनिओ गुटेरस यांची संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भेट घेतली.
गुटेरस यांच्याशी भेट ही आनंददायी घटना असल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या संदेशात म्हंटल आहे. या वेळी उभय नेत्यांदरम्यन, भारताचं जी-20 परिषदेचं अध्यक्षपद, यांसह अफगाणीस्तान, म्यानमा मधील परिस्थिती तसंच अन्य वैश्विक मुद्द्यांवर चर्चा झाली.