मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून राजकीय पक्षांना माहिती…

Spread the love

रत्नागिरी: मतदान केंद्रात झालेले बदल, नवीन प्रास्तावित मतदान केंद्र, नावात बदल केलेली मतदान केद्र, मतदारांचे समायोजन केलेली मतदान केंद्रे आदी मतदान केंद्राच्या सुसुत्रीकरणा बाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन माहिती दिली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, परशुराम ढेकणे, हारीस शेकासन, राहुल पंडित, अद्वैत कुलकर्णी, परेश साळवी आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी यावेळी माहिती दिली. २६३ दापोली मतदार संघात मतदान केंद्रातील मतदारांना मतदान केंद्रापासूनचे अंतर ३ कि.मी. पेक्षा जास्त असल्याने ५ ठिकाणी नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामुळे याआधी १७१० मतदान केंद्रं होती ती आता १७१५ होतील. तसेच मतदान केंद्राच्या स्थळात बदल झालेल्या २४ मतदान केंद्र, नावात बदल झालेल्या ८१ मतदार केंद्र आणि समायोजन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी सविस्तर माहिती दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page