शिवसेना शिंदे गटाचे देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे व राजू सावंत यांच्या पुढाकाराने व कासारकोळवणचे माजी सरपंच सचिन मांगले यांच्या प्रयत्नाने पक्षप्रवेश सोहळा संपन्न
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूख आंबेडकरनगर, देवरूख भंडारवाडी व देवरूख पठारवाडीतील तरूणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांवर प्रेरीत होवून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. शिंदे गटाचे देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे व राजू सावंत यांच्या पुढाकाराने व कासारकोळवणचे माजी सरपंच सचिन मांगले यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
संगमेश्वर तालुक्यात शिंदे गटाने पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, भैय्याशेठ सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत व शशिकांत चाळके, संंगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे व राजू सावंत यांच्या पुढाकाराने व कासारकोळवणचे माजी सरपंच सचिन मांगले यांच्या प्रयत्नाने देवरूख आंबेडकरनगर, देवरूख भंडारवाडी व देवरूख पठारवाडीतील तरूणांनी शिवसेना शिंदे गटात नुकताच पक्षप्रवेश केला आहे.
पक्षप्रवेशकर्ते- देवरूख आंबेडकरनगरमधील योगेश कदम, सतिश कदम, नागेश कदम, सुरेश कदम, नितीन कदम, अक्षय कांबळे, प्रकाश कदम, अंकित जाधव, अस्मीत कदम, विशाल कदम आदि. देवरूख भंडारवाडीमधील मंगेश्वर भाटकर व रोहित गोविळकर, देवरूख पठारवाडीतील जितेंद्र निवळकर, प्रणील कोटकर व साहिल खेडेकर
या सर्व पक्षप्रवेशकर्त्यांचे जिल्हाप्रमुख राहूल पंडीत यांनी शिवसेना शिंदे गटात स्वागत केले आहे. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी पक्षप्रवेशकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सतिश कदम याच्याकडे युवासेना देवरूख शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर यावेळी नागेश कदम याचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी शिवसेना देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे, नित्यानंद देसाई, राजू सावंत, सचिन मांगले, प्रसाद सावंत, अतुल शिंदे उपस्थित होते.