प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार, विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव यांची प्रमुख उपस्थिती.
जनशक्तीचा दबाव न्यूज | माखजन | सप्टेंबर १२, २०२३.
महाविजय २०२४ अभियानांतर्गत लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून आज संगमेश्वर-चिपळूण विधानसभा मतदारसंघातील धामापूर जि.प. गटातील माखजन शक्तीकेंद्रातील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीसाठी महाराष्ट्र भाजपा उपाध्यक्ष सन्माननीय अतुल काळसेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख मा. प्रमोद जठार, संगमेश्वर-चिपळूण विधानसभा निवडणूक प्रमुख मा. प्रमोद अधटराव उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस श्री. काळसेकर यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली. कल्याणकारी योजना, त्यांचे लाभार्थी यांना सुलभ पद्धतीने लाभ मिळवून देण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नशील रहावे असेही त्यांनी सांगितले.
प्रमोद जठार यांनी जलजीवन मिशन, रेशन, किसान सन्मान निधी, पंतप्रधान आवास योजना यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी भाजपाचा प्रचार करण्यासंबंधी आग्रह व्यक्त केला. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रा.पं. सदस्यांनी केंद्र सरकारच्या प्रत्येक योजनेसंबंधी अभिनंदनाचा ठराव करण्याची विनंतीही केली. यानंतर पक्षाच्या विविध उपक्रमांत उल्लेखनीय योगदान देऊन इतर कार्यकर्त्यांच्या समोर आदर्श प्रस्थापित करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सरंद गावच्या तंटामुक्ती संती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री विश्वास पवार यांचा तर सोबतच श्री. जयराम गोटेकर, सौ. शुभ्रा हेमण व सौ. शीतल दिंडे सन्मानाच्या मानकरी ठरल्या.
यावेळी धामापूर जि.प. गटाचे प्रभारी श्री. प्रशांत रानडे, महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. शीतल दिंडे, श्री. अभिजीत शेट्ये, श्री. अनिल घोसाळकर, श्री. मिथुन निकम, जिल्हा सोशल मिडिया संयोजक श्री. अमोल गायकर, श्री. शैलेंद्र धामणस्कर यांच्यासह माखजन शक्तीकेंद्रातील माखजन, सरंद, आंबव पोंक्षे गावातील बूथ प्रमुख, बूथ समिती सदस्य महिला-पुरुष-युवा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.