ओझरे जि.प. गटातील हातीव येथे मोदी सरकारच्या लाभार्थ्यांचा सन्मान…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | सप्टेंबर १२, २०२३.

भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून जनसंपर्क अभियान सुरू आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्रातील ओझरे जि.प. गटात हातीव येथील लाभार्थ्यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीदरम्यान विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री. अतुल काळसेकर म्हणाले की, “पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाप्रति कटिबद्ध असून अत्यंत संवेदनशील आहे. कर्तव्य भावनेने विविध योजना कार्यान्वित केलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब जनतेने घ्यावा अशी सरकारची आग्रही भूमिका आहे.

यावेळी श्री. अनंत तानू शिवगण, श्री. मनोहर शिवगण, श्री. आकाश मिलिंद कांबळे, सौ. निता बुद्धजन कांबळे, श्री. शिवराम यशवंत शिवगण या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी श्री. काळसेकर यांच्यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुक प्रमुख श्री. प्रमोद जठार, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रश्मी कदम, युवा नेते श्री. रूपेश कदम, श्री. अभिजित शेट्ये, श्री. मिथुन निकम, श्री. विनोद म्हस्के, श्री. वैभव कदम, श्री. सतेज नलावडे, श्री. संकेत कदम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page