मुंबई: “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे.”यापुढे तुमच्या विभागातील योग्य मराठी उमेदवाराला मत द्या.राज्य मराठी मग महाराष्ट्रातील उमेदवार सुध्दा मराठीच असला पाहिजे. जो राजकीय पक्ष मराठी उमेदवार देणार नाही. जो राजकीय पक्ष अमराठी, परप्रांतीयांचे लांगुलचालन करेल, त्याचे उमेदवार यापुढे मराठी माणसाला पाडावेच लागणार.राज्यातील समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण हे मराठी समाजाच्या हातात असले पाहिजे या आणि अशा अनेक मराठी भुमिपुत्रांच्या मागणीसाठी आणि जनजागृतीसाठी “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे
” या विषयाला अनुसरून आज रविवार दिनांक:-३/९/२०२३ रोजी सायंकाळी ठिक ४:०० वाजता मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर “मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती” तसेच ||महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या|| माध्यमातून सह्या मोहीम अभियान राबविले असता स्थानिक असलेल्या मराठी माणसाने १४८५+ सह्या करून आपले अमूल्य असे विचार मांडून “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” या विषयाला समर्थन केलेले आहे आणि यापुढेही अशा मराठी माणसांच्या हिताच्या मागण्यांना मराठी समाजाचे समर्थन कायमच राहिल अशी ग्वाही मराठी भुमिपुत्रांच्या वतीने मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेला करण्यात आलेली आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र जय मराठी, धन्यवाद!
महाराष्ट्रात फक्त मराठीच.
:- मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती नोंदणीकृत महाराष्ट्र संरक्षण संघटना रजि.
(मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण यासाठी सदैव कटिबद्ध)