दिवा : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीच्या दिवा शहर मंडळ महिला अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या वतीने गोविंद पथकासाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त गोविंदा मंडळांनी
सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
तरुण गोविंदांना योग्य पध्दतीने दहीहंडी उत्सव साजरा करता यावा यासाठी ज्योती पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. या सराव शिबिरामध्ये मंडळांना लागणाऱ्या सर्व गोष्टी समजावून व त्यांच्यासाठी मानाची ट्रॉफी, Ambulance सुविधा, मेडिकल किट, इन्शुरन्स या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यातील जास्तीत जास्त मंडळानी या सराव शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले आहे.
जाहिरात
जाहिरात