दादासाहेब जकातदार फाउंडेशनचा ‘मंदाश्री पुरस्कार’ डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना जाहीर…

Spread the love

दादासाहेब जकातदार फाउंडेशन तर्फे ‘मंदाश्री पुरस्कार’ यावर्षी ‘श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रसन्न मुळ्ये यांना जाहीर.

जनशक्तीचा दबाव न्यूज | पुणे | जानेवारी ३१, २०२३.

कै. पं. श्रीकृष्ण अनंत जकातदार व कै. सौ. मंदाकिनी श्रीकृष्ण जकातदार यांचे स्मृतिप्रीत्यर्थ दादासाहेब जकातदार फाउंडेशन तर्फे दिला जाणारा मानाचा व प्रतिष्ठित असा ‘मंदाश्री पुरस्कार’ यावर्षी ‘श्री चैतन्य ज्योतिष अभ्यास मंडळ, रत्नागिरी’चे संस्थापक अध्यक्ष ‘डॉ. प्रसन्न मुळ्ये’ यांना जाहीर झाला आहे.

‘ज्ञानफलज्योतिष अभ्यास मंडळ संस्था, पुणे’चे अध्यक्ष, ‘फलज्योतिष ज्ञानपीठ’चे संस्थापक आणि ‘कै. श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब जकातदार फाउंडेशन’चे अध्यक्ष पं. श्री. विजय जकातदार यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे.

दि. ७ फेब्रुवारी रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे येथे सायंकाळी ५.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page